शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

बॅटमॅन...वटवाघुळांचा खराखुरा दोस्त

By अोंकार करंबेळकर | Updated: January 25, 2018 10:07 IST

वटवाघुळांचा हा खराखुरा दोस्त. त्यांच्यासाठी काम हेच त्याचं करिअर. ते त्यानं का निवडलं?

घुबड, वटवाघूळ अशी नावं ऐकली तरी ईईई.... असं करुन त्यावर बोलणंही टाळलं जातं. पक्षी असले तरी वटवाघळांसारख्या पक्ष्यांकडे पाहिलंही जात नाही. त्यामुळे बºयाचदा गैरसमज तयार होतात. पण बारामतीच्या एका तरुणानं वटवाघळांचा अभ्यास करायचा हेच आपलं करिअर असं ठरवलं.महेश गायकवाड. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या महेशच्या या आगळ््यावेगळ््या आवडीचा प्रवासही एकदम भन्नाट आहे. क्रिकेट खेळणं, पुस्तक वाचणं असे छंद महेशला होतेच पण त्याचं खर मन रमायचं ते रानावनात प्राण्यांमागे, पक्ष्यांमागे, मधमाशी-सापांमागे फिरण्यात. बिनभिंतीच्या शाळेचं शिक्षण त्याला जास्त आवडायला लागलं. कोरड्या विहिरीत उतरुन तिथं काय आहे ते पाहा, मुंग्यांच्या वारुळाची- मधमाशांच्या पोळ््यांचं तासंतास निरीक्षण कर, पोपटाच्या ढोलींचं निरीक्षण कर हे असले याचे छंद. वन्यजीव आणि पर्यावरणाची आवड लक्षात घेऊन त्यानं पुण्यात येऊन पर्यावरणशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. मग काही काळ पर्यावरण विषय शिकवण्याचं कामही केलं. पण एकेदिवशी युजीसी आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयातर्फे वटवाघळांचा अभ्यास करण्यासाठी एक प्रकल्प सुरु होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. या प्रकल्पामध्ये वटवाघूळ पकडून त्याचा अभ्यास करणं अपेक्षित होतं. साधारणत: ५० मुलांनी या प्रकल्पात काम करण्याची तयारी दाखवली. महेशनेही आपलं नाव नोंदवलं. पण या मुलांची थेट प्रात्यक्षिकातूनच निवड होणार होती. या सगळ््या पोरांना भुलेश्वराच्या डोंगरावर नेण्यावर आलंं. गंमत म्हणजे नावं देणाºया मुलांपैकी अगदी थोडीच मुलं वटवाघूळ पकडायला तयार झाली आणि शेवटी तर महेश वगळता कोणीच पुढे आलं नाही. महेश पुढे सरसावला आणि त्यानं वटवाघूळ पकडलं. महेशची प्रकल्पासाठी निवड झाली. या प्रकल्पाच्या निमित्ताने महेशची वटवाघळाची ओळख झाली. वेगवेगळ््या जातीची वटवाघळं पाहणं, त्यांचं निरीक्षण करण, त्यांची संख्या मोजणं, त्यांचे उड्डाणमार्ग, आहार-विहार, वटवाघळांच्या जाती याचा अभ्यास त्यानं सुरु केला. वटवाघळांची माहिती त्यानं पुस्तकातूनही मिळवायला सुरुवात केली. हळूहळू अभ्यास वाढवत त्यानं वटवाघळांशी मैत्रीच केली. एम.एससी नंतर त्यानं वटवाघळांच्या अभ्यासावरच आधारीत पी.एचडी प्रबंधही सादर केला.बारामती, माण, फलटण परीसरामध्ये त्यानं वटवाघळाबद्दल लोकांना माहिती द्यायला सुरु केली. शेतकºयांशी बोलल्यावर त्याच्या लक्षात आलं, शेताचं नुकसान करतात म्हणून शेतकºयांच्या मनात रागही असतो. त्यात हा पक्षी रात्रीच उडत असल्यामुळे त्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते. लोकांच्या मनात वटवाघळाबद्दल असंख्य प्रश्न असतात. त्या प्रश्नांना त्यानं उत्तर द्यायला सुरुवात केली.महेश म्हणतो, भारतात १२३ प्रकारची वटवाघळं आढळतात. त्यात २० टक्के वटवाघळं ही शाकाहारी म्हणजे फळं खाऊन जगणारी आहेत. बºयाचदा वटवाघळं रात्री शेतकºयांच्या फळबागेतील फळं खातात. दुसºया प्रकारची वटवाघळं म्हणजे किटकभक्षी आणि मांसाहारी. यांचं प्रमाण एकूण वटवाघळांमध्ये ८० टक्के इतकं आहे.वटवाघळासारख्या पक्षाचा आपल्याला उपयोग काय किंवा अन्नसाखळीत त्याचं स्थान काय असा प्रश्न पडतोच. पण महेश या शंकेचंही निरसन करतो. वटवाघळं रात्रभर तुमच्या परिसरामध्ये किटक खाण्याचं काम करत असतात. एकप्रकारे ती साफ-सफाईही करत असतात. काही फुलांचे परागीभवन केवळ वटवाघळांमुळेच होतं. ३५० झाडांची वृद्धी वटवाघळांवरच अवलंबून आहे. वटवाघळांच्या काही जाती उंदिर, बेडूक खाऊन शेतकºयांना मदतही करत असतात. तर काही वटवाघळं डासांनाही खातात. बियांचं वहन करणं, परागीभवन, बीजारोपण अशी महत्त्वाची कामं रात्रभर अविरत करणारी वटवाघळांची फौज अन्नसाखळीत अत्यंत आवश्यक असल्याचं महेश सांगतो.जर ही सगळी वटवाघळं नाहिशी झाली तर किटकांची संख्या दहा दिवसांमध्ये बेसुमार वाढेल आणि आपल्या पिकांचं नुकसान तर होईलच त्याहून माणसाला जगणं अशक्य होऊन बसेल.

महेश सांगतो, बºयाच जुन्या किल्ल्यांमध्ये पडक्या जागेमध्ये वटवाघळांच्या राहाण्याच्या जागा असतात. किल्ले साफसफाई किंवा स्वच्छतेच्या मोहिमांमध्ये हे अधिवास नष्ट होतात. मग ही वटवाघळे दुसरीकडे निघून जातात. म्हणजेच त्यांच्या संख्येवर परीणाम होतो. तेव्हा किल्ले स्वच्छ करताना वटवाघळांचे अधिवास आपण तोडणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

( ओंकार लोकमत ऑनलाइनमध्ये उपसंपादक आहे.)