शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

तुम्ही डावे की उजवे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 8:08 AM

आपण राजकीय मतं तावातावानं मांडतो, नेत्यांना विरोध करतो किंवा भक्ती करतो; पण आपली राजकीय विचारधारा नेमकी कोणती, हे माहिती आहे का?

- प्रज्ञा शिदोरे

राजकारण हा असा एक विषय आहे ज्याबद्दल प्रत्येकाला मत असतं. केवळ मतच नाही तर आपण अमुक एका विचारसरणीचे आहोत, तमुक पक्षालाच मत देणार, तमुकच नेता लयभारी अनेकजण अतिशय विश्वासाने सांगत असतात.

त्यात ‘डावं-उजवं’ही असतं. अनेक तरुण मुलांना ही डावी-उजवी विचारसरणी माहिती असतेच असं नाही. पण तरी अमुक एखाद्या पक्षाचं राजकारण डावं आहे आणि तमुकउजवेच आहेत वगैरे बोलणारेही अनेकजण आपल्यात असतात.पण हे उजवं, डावं म्हणजे नक्की काय आहे? त्याचा धोरणांशी, विचारांशी काय संबंध असतो?

खरं तर राजकीय विचार समजून घेण्यासाठी हे माहिती असणं गरजेचं आहे. खासकरून जेव्हा, ‘राजकारणामधून विचारसरणीचा किंवा आयडियॉलॉजीचा ऱ्हास होतो आहे’ असं आपण ऐकतो तेव्हा. तर हे सारं समजून घेऊन आपली राजकीय मतं बनवणंही आपल्या हिताचं असतं.

२००१ साली ब्रिटनमधील एका संशोधन संस्थेने, लोक किंवा मतदार आपली राजकीय मते कशी तयार करतात, या विषयावर अभ्यास करायचा ठरवला. त्या अभ्यासात त्यांच्या लक्षात आलं की लोक जेव्हा ‘मी डाव्या किंवा उजव्या विचारसरणीला मानणारा आहे’ असं म्हणतात; पण त्यांचे एखाद्या राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक निर्णयाबद्दलचे मत ते जे म्हणतात त्या विचारसरणीला अनुसरून असेलच असं नाही. उदाहरण घ्यायचं असेल तर, ‘भारतात लोकशाहीचा काहीही उपयोग नाही, इथे दंडेलशाही किंवा सरळ लष्कराची राजवटच हवी’ असं काहीजण म्हणतात. पण लष्करी किंवा हुकूमशाही राजवटीचा सामाजिक, आर्थिक परिणाम काय होईल, लष्कर शिक्षणावर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर कशा भूमिका घेईल हे आपल्याला अजिबातच माहीत नसतं. म्हणूनच अशी मतं ठामपणे मांडण्यापूर्वी, आपली राजकीय बाजू ठरवण्याआधी आपण या राजकीय नकाशामध्ये नक्की कुठे आहोत हे माहीत करून घ्यायला हवं. या सर्व विचारांमधून ‘पॉलिटिकल कम्पस’ ज्याला आपण मराठीत ‘राजकीय दिशादर्शक’ म्हणू असा तयार होतो. आणि त्यात आपण कुठं आहोत? हे शोधणं फार गमतीचं आणि तितकंच गरजेचंही ठरतं.

तर ते कसं शोधायचं?त्यासाठी ‘पॉलिटिकल कम्पस’ नावाचं एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर आपलं राजकीय ज्ञान वाढावं यासाठी बरेचसं साहित्य उपलब्ध आहे. ज्ञान म्हणजे इथे काही माहिती दिलेली नाही. राजकीय माहिती आपल्याला इतर कोणत्याही संकेतस्थळावर मिळूच शकते; पण इथं राजकीय विचार कसा करावा, आपलं मत कसं ठरवावं, यासाठी लागणारं आवश्यक साहित्य उपलब्ध केलेलं आहे. आपल्याला आपले आणि आपण ज्या राजकीय परिस्थितीमध्ये राहतो त्याचं अचूक विश्लेषण करता यावं यासाठी लागणारी सर्व आयुधं इथे उपलब्ध आहेत.http://www.politicalcompass.org/

६१ प्रश्नांची उत्तरं

पॉलिटिकल कम्पसच्या साइटवर एक प्रश्नावली मिळेल. ती सोडवा. या संकेतस्थळावर ही ६१ प्रश्नांची प्रश्नावली आहे. या यादीमध्ये सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयांवर प्रश्न विचारले गेले आहेत. हे प्रश्न अगदी थेट नाहीत; पण हे अशा खुबीने विचारले गेले आहेत की ज्यामुळे आपल्याला आपला राजकीय कल लक्षात येईल.उलटे-सुलटे प्रश्न आहेत, त्याची टिकमार्क करत उत्तरं द्यायची आहे. म्हणजे आपल्याला त्या प्रश्नाचं कोणतं उत्तर योग्य वाटतं हे निवडायचं आहे.

त्या उत्तरातून ही साइट सांगते की आपली राजकीय विचारधारा नेमकी कोणती आहे. आपण कशाप्रकारे राजकीय विचार करतो.आपण किती उदारमतवादी आणि एकाधिकारशाही कितपत मान्य आहे, आपण उजवे की डावे आणि तेदेखील किती प्रमाणात हेसुद्धा ही साइट काही मिनटांत सांगते.

याची आणखी एक गंमत अशी की, तुम्ही दिलेली उत्तरे कोणत्या तत्त्वज्ञाच्या विचारसरणीशी मिळती-जुळती आहे, हेदेखील तुम्हाला कळू शकतं. याबरोबरच इथे या सार्वजनिक वापरांमधल्या शब्दांचा नेमका अर्थदेखील सांगितला गेला आहे.तर नक्की ही प्रश्नावली सोडावा आणि राजकारणही समजून घ्या, पॉलिटिकल कम्पस या संकेतस्थळावर .हा राजकीय शोध फार महत्त्वाचा आहे.

पाहा आणि सोडवा..https://www.politicalcompass.org/test