शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अपिरो....फुग्यातून अवकाशात झेपावणारा गोव्याच्या बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्यांचा एक मायक्रो उपग्रह

By meghana.dhoke | Published: November 30, 2017 5:00 AM

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला पहिला मायक्रो सॅटेलाइट. जो रेडिएशनचा तर अभ्यास करेलच पण अवकाशात जाईल तोच एका मोठ्या फुग्याचा हात धरून..

इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेली ही मुलं. गोव्याच्या बिट्स पिलानी या संस्थेत शिकणारी. तसं त्यांचंही प्रोजेक्टबिजेक्टवालं इंजिनिअरिंग सुरूच होतं. पण त्यांच्या लक्षात आलं की आपल्या सिनिअर विद्यार्थ्यांनी वातावरणाचा काही अभ्यास केला आहे. आणि तो अभ्यास असं सांगतो की, रेडिएशन अर्थात अंतरिक्ष विकिरणांचा अभ्यास अधिक तपशिलात करणं गरजेचं आहे. सिनिअर्सनी केलेल्या अभ्यासाचं नीट अवलोकन केल्यावर या विद्यार्थ्यांनी ठरवलं की आपण या रेडिएशनच्या विषयात पुढे काम करायचं.आणि काम सुरू झालं.संकेत देशपांडे, लकी कपूर, शिवांगी कामत, पंकज टिपले, वैभव जोशी आणि ऐश्वर्या प्रवीण या गॅँगने ठरवलं की आपण वातावरण आणि रेडिएशन पॅटर्नचा अभ्यास करु. तो कसा करायचा याचा विचार करत असतानाच त्यांनी ठरवलं की आपण एक मायक्रो सॅटेलाइटच बनवला तर. काम सुरु झालं. गेली ४ वर्षे ही मुलं हे काम करत आहे. अभ्यासातून आपल्याला मिळणारा रिकामा वेळ, सुटी याचा सदुपयोग हा मायक्रो सॅटेलाइट बनविण्यासाठी ते करू लागले.आणि आता येत्या डिसेंबरमध्ये हा सॅटेलाइट लॉँच करायच्या ते तयारीत आहेत.संकेतशी या संदर्भात चर्चा झाली. तो मूळचा मराठवाड्यातला. औरंगाबादचा. त्याला विचारलं कशी सुचली ही आयडिया?तो सांगतो, ‘इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला सोलर सिस्टीमचा अभ्यास करत होतो. माझ्या सिनिअर्सनी केलेलं काम पाहिलं. सोबत माझे दोस्तही होते. आम्ही हे काम पुढं नेताना टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फण्डामेण्टल रिसर्च आणि भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरच्या अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञांशी बोललो. त्यांचं मार्गदर्शन घेतलं. आम्ही ठरवत असलेली उपग्रहाची कल्पना, त्याची साधारण रचना त्यांना सांगितली. आणि त्यांना ती आवडल्यानं टीआयएफआरनेच हा सॅटेलाइट लॉँच करायचं ठरवलं. त्यांच्या हैदराबाद येथील नॅशनल बलूनिंग फॅसिलिटीद्वारे लॉँच करायचं ठरवलं. तेही आमच्याकडून कुठलाही मोबदला न घेता. अजून काय हवं होतं, आम्ही कामाला लागलो.’प्रोजेक्ट अपिरो असं या उपक्रमाचं नाव. अपिरो हेच नाव त्यांनी उपग्रहाला दिलं आहे. कॉस्मिक रेडिएशनचा अभ्यास हा उपग्रह करणार आहे. अशा पद्धतीनं काम करणारा आणि विद्यार्थ्यांनी बनवलेला हा देशातला पहिलाच उपक्रम आहे.डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा उपग्रह लॉँच होईल. २२ किलोमीटर अल्टिट्यूड अर्थात समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर तो असेल. आणि त्याद्वारे रेडिएशनचा डेटा ट्रॅक केला जाऊ शकेल.रेडिएशनचा अशाप्रकारे अभ्यास करण्याचा हा प्रयत्न ही या तरुण विद्यार्थ्यांची मोठी झेप मानायला हवी. या उपक्रमाचे यश अन्य विद्यार्थ्यांनाही पथदर्शी ठरेल अशी आशा आहे.

प्रोजेक्ट अपिरो काय आहे?वातावरणात विकिरण किती होतं आहे याचा अभ्यास करणं अर्थात रेडिएशनचा अभ्यास करणं हे या उपग्रहाचं काम. अत्यंत कमी खर्चात या मुलांनी हा उपग्रह तयार केला आहे. आजच्या घडीला स्पेस रेडिएशनचा काही डेटा आपल्याकडे उपलब्ध नाही. मात्र ज्यांचा सतत या रेडिएशनशी संपर्क येतो, ज्यांच्या त्वचेवर, आरोग्यावर त्याचा परिणाम होतो त्यांच्यासाठी रेडिएशनची योग्य माहिती असणं, दिवसाच्या कोणत्या काळात ते जास्त असेल हे माहिती असणं जास्त उपयुक्त ठरू शकेल. विशेषत: हवाई दळणवळणाच्या संदर्भात. आपल्याकडे विमानउड्डाण उद्योग वाढतो आहे. फ्लाइट्सची संख्या मोठी. त्यांच्या पायलट्सना या माहितीचा फायदा होऊ शकेल.रेडिएशनचा डेटा उपलब्ध झाला तर अंदाज वर्तवणारं एक मॉडेलही तयार करता येऊ शकेल. की अमुक शहरात रेडिएशनची लेव्हल दिवसा कुठल्या वेळेत कशी असेल. त्यादृष्टीनं या उपग्रहाची बांधणी आणि त्यातून मिळणारी माहिती महत्त्वाची आहे.सध्य नासाही अशाच एका मॉडेलवर काम करत असून, ते ही त्यातून डेटा मिळवण्याचं काम करत आहे.त्यादृष्टीनं विचार करता भारतातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा स्पेस बलूनिंग प्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे.

बलूनिंग पद्धत म्हणजे काय?आपल्याला उपग्रह, त्यांचं लॉँचिंग यासंदर्भात इस्रोनं अंतराळात पाठवलेले उपग्रहच माहिती असतात. पण हे स्पेस बलूनिंग ही तितकंच रंजक आणि अत्यंत उपयुक्त आहे. कमी खर्चिक आहे. त्याला म्हणतात हाय अल्टिट्यूड बलून्स. त्यात इंधन म्हणून हेलिअम, हायड्रोजन आणि क्वचित कधी मिथेनही भरलेलं असतं. व्हेदर बलून्सही त्याला म्हणतात. या मोठाल्या फुग्यांसोबत ट्रान्समीटर, कॅमेरा, छोटे सॅटेलाइट, जीपीएस रिसिव्हर पेलोड्सद्वारे अवकाशात पाठवले जातात. भारतात असाच उपक्रम हैदराबाद येथे टीआयएफआरद्वारे राबविला जातो.

(लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)