शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

आलिया...जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 13:23 IST

जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं. हा मी ठरवलेला एक साधासोपा मार्ग आहे. त्यावरून चालत राहणं मला आवडतं.

धीस इज लाइफ. माय लाइफ.जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं. हा मी ठरवलेला एक साधासोपा मार्ग आहे. त्यावरून चालत राहणं मला आवडतं.माझे वडील. तुम्हांला त्यांचं नाव आणि स्वभाव सगळंच माहीत आहे. ते नेहमी सांगतात, द बेस्ट आॅफ नोइंग इज नॉट नोइंग...‘मला माहीत नाही’ असं एकदा मान्य केलं की, माहिती करून घेणं सुरू होतं. हे एक फार सोपं लॉजिक आहे. मी तेच वापरते.माझ्यासाठी आयुष्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत : लॉजिक आणि लव्ह!लव्ह म्हणजे स्वत:वरचं प्रेम. सेल्फ लव्ह. माझं प्रेम आहे स्वत:वर. मी जी काही आहे, जशी आहे तसं मी स्वत:ला स्वीकारलं आहे. मनापासून. मी प्रेमानं सांगते स्वत:लाच, इट्स ओके आलिया, इफ यू डोण्ट नो सो मेनी थिंग्ज, इट्स ओके. जे येतं, ते फक्त नीट कर!मला काय येतं?- तर कॅमेºयासमोर उभं राहून ते जे काही कॅरेक्टर आहे, ते मला जगता येतं.माझ्या आयुष्यात अगदी लहानपणीच माझ्याही नकळत हे माझ्यात भिनलं की, बदल हीच एकमेव सतत चालणारी गोष्ट आहे. जग बदलतं. आपण बदलतो. बºयाच गोष्टी असतात, तशा राहत नाहीत. आयुष्य घट्ट मुठीत करकचून आवळून नाही ठेवता येत.यश मिळालं तर ते दोन्ही मुठीत घट्ट धरून ठेवता येतं का? ते यश सांडू नये, हरवू नये, कुणी हिसकावू नये किंवा कायमचं आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून किती काळ मूठ आवळणार आपण?- यशाचं अत्तर इटुकल्या जागेतून कधी हवा होईल आपल्या लक्षातही येणार नाही. मग कशाला मूठ आवळा? त्यापेक्षा तळहातावर जे काही जगणं आहे ते जगलेलं, जपलेलं बरं.आज आलियाकडे यश आहे, उद्या असेलच असं नाही. मिळालेलं यश असं कायमचं, सतत आपल्यासोबत राहत नाही, याची मला जाणीव आहे. आज मला यश मिळतंय, उद्या दुसºया कुणाला मिळेल. आज लोक मला बेस्ट म्हणतात; पण उद्या माझ्यापेक्षा बेटर कुणीतरी येईल. आपल्यापेक्षा सर्वार्थानं बेटर असं कुणीतरी असतंच या जगात. त्यानं आपली जागा घेतली की आपण आउट!मग आपण काय करायचं?आपलं मन म्हणतं ते बिनधास्त करायचं!आपलं मन देतंच की इण्ट्युशन!आपलं इन्स्टिंक्ट असतं, ते दाखवेल त्या दिशेनं जायचं. जाता-येता अखंड प्लॅनिंग-प्लॅनिंगचा खेळ नाही खेळायचा. सतत फार विचारबिचार करून निर्णय घेतले की, त्या निर्णयांतली सगळी गंमत निघून जाते.समोर आलं. आवडलं. करावंसं वाटलं. केलं. मस्त केलं. मजा आली. समाधान वाटलं. संपलं!हवं कशाला प्लॅनिंग ज्यात त्यात?मी हेच करते.माझे वडील नेहमी म्हणतात, यशाची चव चाखली की माणसांचा एक प्रॉब्लेम होतो. त्यांना वाटू लागतं की हे यश कायम राहील. यश कसं मिळवायचं याचा फॉर्म्युलाच सापडला आपल्याला. आणि मग अनेकजण गोष्टी इझी घ्यायला लागतात. त्यांना वाटतं, जमलं आता! पुढे सोपंच असणार सगळं. एकदा जमलं म्हणजे मग यापुढे सतत जमेलच!‘जमतं आपल्याला’ हा एक ट्रॅप आहे, हे लक्षात ठेवलेलं बरं...