डॉ. सुनील कुटे (चेअरमन, बोर्ड ऑफ स्टडिज सिनेट मेंबर, सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ)
आंतरराष्ट्रीय रेडिओ सायन्स युनियनचा यंदाचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार मिळालेल्या तरुण शास्त्रज्ञाची खास भेट.
-------------
रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी नावाच्या वेगळ्याच जगात चाललंय त्याचं संशोधन. आपल्या आकाशगंगेत वाढत जाणारे अनावश्यक ध्वनी आणि सिगAल ओळखून ते कमी करण्याचं, काढून टाकण्याचं
भलतंच इंटरेस्टिंग संशोधन करण्यात ‘तो’ आघाडीवर आहे.
------------
अजिंक्य पाटील.
औरंगाबादजवळच्या जटवाडा या खेडय़ातील बोर्डिग स्कूल म्हणजेच आर्य चाणक्य विद्याधामचा तो विद्यार्थी. आंतरराष्ट्रीय रेडिओ सायन्स युनियनचा यंदाचा, अत्यंत प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार अलीकडेच बीजिंग येथे अजिंक्यला प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे तो सध्या ज्या नेदरलँड देशात संशोधन करीत आहे, त्या देशाचा एकमेव युवा शास्त्रज्ञ म्हणून त्याचा हा गौरव झाला. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी अजिंक्यने घेतलेली ही भरारी भारतीय युवकांच्या बुद्धिमत्तेला जागतिक पातळीवर मिळालेली केवळ मान्यताच आहे.
जटवाडय़ाला शिकत असताना अजिंक्यने वाचनाची आवड जोपासली. हार्मोनिअमच्या माध्यमातून संगीताची साधना करता करता बॅडमिंटनचे मैदानही गाजवले. त्याला पोहायला आवडायचं, मात्र पाण्यातून दिसणारं आकाश त्याला खुणावत होतं. रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी हा वेगळा विषय त्याला खुणावू लागला. पण या विषयात शिरायचं तर त्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि सुविधा पाहिजेत आणि त्या मिळवायच्या तर देशातल्या नामवंत संस्थेत प्रवेश मिळायला हवा, हे त्याला माहिती होतं. मेहनत करून त्यानं आयआयटी खरगपूरला इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. ‘आयआयटी’तल्या अवघड अभ्यासक्रमातून विरंगुळा म्हणून सुट्टीत घरी मजा करणा:या वर्गमित्रंच्या दिशेने न जाता अजिंक्यने द्वितीय वर्षात जाण्याच्या आधीच, सुट्टीत बंगलोरच्या रमण संशोधन संस्थेत एक प्रशिक्षण घेतले. सुट्टीतल्या या प्रशिक्षणात त्याची अमेरिका, ऑस्ट्रेलिया व इतर प्रगत देशातल्या प्रशिक्षणार्थीसोबत ओळख झाली. रेडिओ टेलेस्कोपसाठी डिजिटल रिसिव्हर बनविण्याच्या प्रकल्पावर सुट्टीत काम करत असतानाच त्याला सहका:यांकडून परदेशात या विषयात सुरू असलेल्या संशोधनाची माहिती मिळाली. ते क्षितिज त्याला खुणावू लागलं याचाच परिणाम म्हणून त्याने अमेरिकेतील नॅशनल रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी ऑब्जर्व्हेटरी (ठफअड) या जगप्रसिद्ध संस्थेत प्रशिक्षणासाठी अर्ज केला. त्या अर्जात त्याने या विषयात काय काम करायला आवडेल या संबंधीचा जो निबंध जोडला, अनुमोदन देणारी प्राध्यापकांची जी तीन शिफारसपत्रं जोडली ती इतकी प्रभावी होती की, जगभरातून आलेल्या शेकडो अर्जातून अजिंक्यची या प्रशिक्षणासाठी निवड झाली. इतकेच नाही तर ठफअड ने त्याला येण्याजाण्याचा खर्च आणि मासिक सुमारे 1 लाख 96 हजार रुपयांची शिष्यवृत्तीही दिली. यावरून त्याच्या प्रस्ताव निबंधाची गुणवत्ता लक्षात येते.
अमेरिकेत व्हजिर्निआ येथे अडीच महिन्यांच्या या शिष्यवृत्तीने अजिंक्यची पुढची दिशाच ठरून गेली. खरगपुरमधून बी.टेक झाल्यावर याच क्षेत्रत काम करण्याचं अजिंक्यनं निश्चित केलं.
रेडिओ अॅस्ट्रॉनॉमीची वेगळी वाट निवडताना अजिंक्यने केलेल्या सर्वेक्षणात असं लक्षात आलं की, जगात नेदरलँडने या संशोधनात आघाडी घेतली आहे. दुस:या महायुद्धात डच संशोधकांनी रेडिओ टेलेस्कोप जर्मनीकडून विकत घेतला तेव्हापासून त्यांचे या क्षेत्रत भरीव संशोधन सुरू आहे. इतकेच नाही तर आज या संशोधनात ते जगात अग्रेसर आहेत. अजिंक्यला मग नेदरलँडची केपटेयन अॅस्ट्रॉनॉमीकल इन्स्टिटय़ूट साद घालू लागली. त्याने या संस्थेकडे संशोधनाचा प्रस्ताव सादर केला. खरं तर बी. टेकनंतर एम.टेक व नंतर पीएच.डी. असा प्रवास असतानाही केवळ संशोधन प्रस्तावातील गुणवत्तेच्या जोरावर अजिंक्यला नेदरलँडमध्ये संशोधन प्रकल्पावर काम करण्याची संधी देण्यात आली. याबद्दल त्याला शेवटी सरळ पीएच.डी. पदवी मिळेल. सप्टेंबर 2क्12 पासून तो या प्रकल्पावर रुजू झाला.
आणि या प्रकल्पासाठी त्याला किती निधी मंजूर झाला असेल?
12 कोटी रुपये.
या प्रकल्पावर काम करणारा तो एकमेव भारतीय आहे. विशेष म्हणजे या संशोधनासाठी जगात कुठेही जाण्यासाठी त्याला कुणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही. सर्व खर्च स्वत:च्या इच्छेने करण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार त्याच्याकडे आहेत.
अजिंक्यचे हे संशोधन अखंड सुरू आहे. त्याबद्दल त्याला दर महिन्याला सुमारे 1 लाख 60 हजार रुपये विद्यावेतनही दिले जाते. अशा सुविधा व प्रयोगशाळा उपलब्ध करून मिळणारा तो नेदरलँडमधील पहिला भारतीय आहे.
अजिंक्यचे आईवडील नाशिकला असतात. वडील प्राध्यापक आणि आई आरोग्य विज्ञान विद्यापीठात कार्यरत. मध्यमवर्गीय वातावरणात वाढलेला हा तरुण जिद्दीने रेडिओ अॅस्ट्रॉनॉमीसारख्या कोणतीही पाश्र्वभूमी नसलेल्या विषयात संशोधन करतो आहे. युवा संशोधक म्हणून चीनमध्ये त्याचा आंतरराष्ट्रीय गौरव होतो. या सा:या बाबी पुन्हा एकदा सिद्ध करतात की भारत हा बुद्धिमान लोकांचा देश आहे. ए.पी.जे. अब्दुल कलामांच्या भाषेत बुद्धिमान तरुणांचा देश आहे. त्या बुद्धिमान तारुण्याचाच हा एक प्रतिनिधी.
- ‘अजिंक्य’
------------------------
अजिंक्य नक्की कशावर संशोधन करतोय?
विश्वनिर्मिती कशी झाली ह्याचं प्रतिपादन बिगँग थिअरीद्वारे करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे.
त्यातून अशी मांडणी पुढे आली आहे की विश्वातले इलेक्ट्रॉन्स व प्रोटॉन्स हे प्लाझ्मा अवस्थेत असतात. तापमानातील वाढीमुळे विश्व प्रसरण पावते. त्यामुळे प्लाझ्मा अवस्थेतील इलेक्ट्रॉन्स व प्रोटॉन्स हे आयोनाइज्ड होऊन न्युट्रल अवस्थेत रुपांतरीत होतात. अशा रुपांतरणाुळे अनावश्यक सिग्नल्स व ध्वनीचा संचार आकाशगंगेत वाढतो. हे अनावश्यक ध्वनी व सिग्नल ओळखणो व कमी करणो हे आजचे आव्हान आहे. उच्च फ्रिक्वेन्सीचा डेटा गोळा करुन त्याचे पृथ्थकरण करण्याचे तंत्रज्ञान आज विकसित झाले आहे. सध्याचे मोबाईल त्यामुळेच प्रभावीपणो काम करु शकतात. पण कमी फ्रिक्वेन्सीचा डेटा गोळा करणो, त्यातील अनावश्यक सिगAल व ध्वनी ओळखणो, तो काढून टाकणो हे काम अजिंक्यच्या प्रकल्पात समाविष्ट आहे. लूप फ्रिक्वेंसी अॅरे (छडऋअफ) नावाच्या 30 ते 300 इतक्या कमी फ्रिक्वेन्सीवर काम करु शकेल अशा रेडीओ टेलेस्कोपची निर्मिती, तिचे मॉडेलींग, कॅलिब्रेशन, आपल्या अवकाशगंगेचा ब्राइट मोजणो इ.इ. कामांचा या संशोधनात समावेश आहे. अवकाशगंगेतील पल्सर ता:यांचे 1क् कि.मी. ने आंकुचन घडविले तर ते कमी फ्रिक्वेंसीवर काम करतात, तसे आकुंचन घडविणो ही आव्हानात्मक कामे अजिंक्यच्या या प्रकल्पात आहेत.