शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

फुटबॉल मॅचमध्ये किती गोल होतील, AI ला विचारा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 4:11 PM

फुटबॉल वर्ल्डकप पाहताय, आता तिथंही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतोय. कोणती टीम कुणावर मात करेल, किती गोल होतील, याचेही आडाखे एआय बांधतंय.

ठळक मुद्देरशियातील फुटबॉल वर्ल्डकपचा थरार पाहताना AI डोक्यात असू द्या.

- डॉ. भूषण केळकर

या लेखमालेच्या निमित्तानं ज्या ई-मेल्स तुम्ही पाठवताय त्यामध्ये बरेच वाचक विचारताहेत की या इंडस्ट्री 4.0  मध्ये संधी कुठे आहेत आणि त्यासाठी तयारी कशी करावी?आज विविध क्षेत्रांमध्ये इंडस्ट्री 4.0 कसा परिणाम करताहेत ते आपण पुढील 10 लेखांत बघू. पण संधीबाबत बोलायचं झालं तर आता एआय, आयओटी, बिग डाटा असे उपघटक बघतो आहोत त्याविषयी बोलू. त्यातील गेल्या आठवडय़ातील उदाहरणं देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आगामी काळात या इंडस्ट्री 4.0  चा वापर कसा वाढता असेल.ले. जनरल श्रीवास्तव यांनी एआरडीई या डीआरडीओच्या एका संस्थेत बोलताना सांगितलं की, उद्याची युद्धं कालच्या शस्त्रांनी लढता येणार नाहीत. एआयचा वापर आपल्याला अत्यावश्यक आहे. मला तर वाटतं हे वाक्य त्यांनी सामारिक परिप्रेक्षामध्ये सांगितलं असलं तरीही ही युद्धं फक्त सैन्यदलं, वायुसेना व नौसेनपुरती सीमित नाहीत. त्याची व्याप्ती औद्योगिक, व्यवस्थापन, मनुष्यबळ व आर्थिक क्षेत्रांतपण पोहोचेल हे नक्की. नासकॉमचे गगन सबरवाल यांनी मागील डिसेंबरमध्ये चीनमध्ये पहिला आयटी कॉरिडॉर उभारल्याचे जाहीर केले होते. परवा परवाच भारताने चीनमध्ये दुसरा आयटी कॉरिडॉर स्थापन केला आहे. पहिला दालियानमधला  आयओटी, तर आता गुयीसंगचा बिग डाटाचा आहे. अगदी कालची ताजी बातमी म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांनी कृषी तंत्रज्ञान, मृद व्यवस्थापन व कीड निमरूलनाच्या क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करणं व वाढवणं यासाठी कॅनडातील क्युबेक प्रांताचे अधिकाधिक सहकार्य मिळवण्यात  यश मिळवले. या सामंजस्य करारानुसार 50 स्टार्टअप्सना सहकार्य व मदत मिळणार आहे, तेही एआय क्लस्टरमधून.म्हणजे बघा, अगदी गेल्या आठवडय़ातच अगदी महाराष्ट्रातल्या या बातम्या कृषी, आयटी, संरक्षण अशा तीन महत्त्वाच्या क्षेत्रात एआयचा वापर दर्शवतो.तुम्ही जर स्वतर्‍ काही व्यवसाय करत असाल किंवा स्वयंरोजगाराच्या विचारात असाल तर तुम्हाला बरेचदा एक बेवसाइट बनवावी लागते. लोकांर्पयत पोहोचायला म्हणून ही वेबसाइट बनवायचं ठरवलं तरी काही वेळा खर्चीक, वेळखाऊ असू शकतं. पण भारतीय वंशाच्याच सचिन दुग्गलने इंजिनिअर एआय ही कंपनी सुरू केली आहे. ज्यात बिल्डर या एआयवर आधारित प्रणालीनुसार अत्यंत कमी व 1/3 किमतीत तुम्हाला वेबसाइट करून मिळते.तर या एआयमध्ये अनेक प्रकार आहेत. चार महत्त्वाच्या संज्ञा आहेत. त्या आपण समजून घेऊ. स्टॅटिस्टिक्स, एक्सपर्ट सिस्टिम, फॅझी लॉजिक, न्यूरल नेटवर्क्‍स.1. सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स हे समजायला सोपं आहे कारण बरेचदा आपण ते दहावीपासूनच शिकत असतो. स्टॅटिस्टिक्स हा एआयचा कणा आहे. क्लासिफिकेशन, क्लस्टरिंग, प्रेडिक्शन, असोसिएशन इत्यादीसाठी याचा वापर होतो. ज्या गोष्टी समान वाटतात त्यातील फरक शोधणं व ज्या वेगळ्या भासमान होतात त्यात साम्य शोधून त्याचा समूह/समुच्यय करणं. क्लस्टरिंग हा पण एआयचा भाग. अनेक घटकांचा एखाद्या गोष्टीवर होणारा परिणाम नेमका ओळखून त्याचं प्रारूप बनवणं म्हणजे प्रेडिक्शन. आणि सहयोग सांगणं म्हणजे कशाबरोबर काय आढळेल हे  सांगणं. हे शेवटचं उदाहरण तुम्हाला छान लक्षात राहिलं बघा.एक्सपर्ट सिस्टिम म्हणजे तज्ज्ञ लोकांच्या मुलाखती घेऊन, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांवर आधारित ठोकताळे मांडून त्यावर आधारित प्रारूपं/मॉडेल्स हे कॉम्प्युटरला शिकवणं. उदा. एखादा फार न शिकलेला पण खूप वर्षे एखाद्या मशीनवर काम केलेला कर्मचारी केवळ अनुभवातून बर्‍याच गोष्टी अशा काही सांगू शकतो की एखादा इंजिनिअर पण चकित होईल. या मानवी अनुभवजन्य ज्ञानावर/नियमावर आधारित प्रारूपं म्हणजे एक्सपर्ट सिस्टिम्स.  फजी लॉजिक आणि न्यूरल नेटवर्क्‍स विषयी आपण पुढील लेखात अधिक जाणून घेऊ. तत्पूर्वी आपण हे लक्षात ठेवू की एआयच्या या चारही घटकांचा वापर क्रीडाक्षेत्रातही वाढता आहे. फुटबॉलचे गोल व पेनल्टी किक्स हे त्याचं उदाहरण. तिथंही आता एआयचा वापर होतोय. रशियातील फुटबॉल वर्ल्डकपचा थरार पाहताना हेही डोक्यात असू द्या.

( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)