शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

49 रुपये वारले. - ऑनलाइन टीम बनवण्याचं व्यसन, सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 4:56 PM

टीम बसवत घरबसल्या थ्रिल  आणि पैसा शोधत आयपीएल पाहणार्‍या  पोराटोरांची जुगार गोष्ट

- श्रेणिक नरदे

क्रि केट हा भारताचा आत्मा आहे. या खेळाचे सर्वाधिक प्रेक्षक आपल्या देशात आहेत. खेळाडूंवरचं प्रेम, कधी टोकाचा तिरस्कार, विजयाचा जल्लोष, तर कधी पराभवामुळे खेळाडूंना धमक्या देण्यापर्यंत प्रेक्षक अतिच इमोशनली या खेळात इन्व्हॉल्व्ह होत जातात.हे वर्षानुवर्षं चालत आलेलं आहे आणि पुढेही हा वेग असाच राहील किंबहुना याहूनही वाढेल. इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीलच्या सामन्यांनी तर अक्षरश: भारताला वेडं केलं आहे. यंदा कोरोनाच्या महाभयानक संकटातही आवश्यक त्या उपाययोजना करून दुबईमध्ये हे सामने त्याच उत्साहात खेळवले जात आहेत. आपल्या क्रि केटवेड्या देशात खेळाडूंची, खेळाची, अम्पायर, कोच लोकांची जितकी चर्चा चवीनं होत असते तितक्याच चवीनं दबक्या आवाजात क्रि केटवर लावल्या जाणार्‍या सट्टय़ाचीसुद्धा होत होती. मात्र गेल्या काही वर्षांत या सट्टय़ाची चर्चा खुलेपणानं होऊ लागली आणि गप्पांतून सरळसरळ आज कोण खेळेल असं वाटतं रे? आज याला कप्तान करायचं की याला व्हाइस कप्तान करायचं? ही चर्चा खुलेआम चालू झाली.  आता हे आपले लोक डिविलियर्स, कोहली, रसेल, धोनी, के.एल. राहुल, कार्तिक, उथप्पा, रोहित शर्मा आणि अशा बर्‍याच खेळाडूंना टीमच्या बाहेरही ठेवू शकतात. आपल्या गल्लीतले लोक असं करू शकतात? हो. कुठं? तर मोबाइलमधल्या स्पोर्ट एप्लिकेशनमध्ये. फॅण्टसी स्पोर्टस हे एक नवं सट्टय़ाचं व्यासपीठ आज जगभरासाठी खुलं झालं आहे. पूर्वी सट्टा लावणं म्हणजे काहीतरी गुन्हा करणं असं वाटायचं; पण आता भाऊ-बहीण, बाप-लेक, दोस्तलोक एकत्र बसून सट्टा खेळत असतात. आणि त्यात काही वाईट नाही असंही बहुसंख्यांना वाटतं. 49 रुपये गुंतवले, अँपवर दोन्ही टीममधले योग्य लोक हेरून तुमची टीम निवडली, कर्णधार, उपकर्णधार चांगले खेळले आणि निवडलेल्या टीममधील सर्व खेळाडू उत्तम खेळले तर तुम्ही 49 रुपयांच्या बदल्यात एक कोटी रुपये कमावू शकता अशी इथली लालूच आहे. निवडलेले एक-दोन खेळाडू जरी खेळले नाहीत, पहिलं बक्षीस नाही मिळालं तरी खालची बक्षिसं असतातच.हे सगळं सांगतोय म्हणजे सट्टा खेळायला शिकवण्याचा माझा हेतू नाही; पण अनेकजण कशामागे सध्या पागल झालेत त्यातलं सूत्र तेवढं सांगतो आहे.टीम अगदीच खराब खेळली तर तुमचे 49 रु पये वारतात. आणि रात्री झोप येत नाही.  थोडक्यातच माझं बक्षीस हुकलं रे. म्हणत तळमळत बसावं लागतं.दुसर्‍या दिवशी त्याच उत्साहानं परत टीम तयार करायची. खेळायचं. काही जिंकायचं किंवा हारायचं. या उत्साहाचा अभ्यास करून तयार झालेले हे फॅण्टसी स्पोर्ट्स अँप्लिकेशन सामान्य लोकांच्या या सट्टा लावण्यातून भरपूर कमाई करू लागले आणि त्या कमाईतील चौथा भाग बक्षीस म्हणून वाटू लागले. मात्र या फॅण्टसी टीम तयार करण्यात लाखो लोकांत रोज एखादा यशस्वी ठरतो. आणि निम्म्याहून अधिक लोक आपले पैसे गमावतात. 

रोज यशापयशाची ही साखळी सुरूच असते. रात्री 11-12 वाजेस्तोवर मॅच बघण्याहून जादा आपले पॉइण्ट तपासण्यातच वेळ जात असतो. गल्लीतील कट्टय़ापासून ते मोठय़ा ऑफिसपर्यंत हरेक ठिकाणी क्रि केटचे आधी चाहते असायचे आता सट्टेबाज आहेत. या सर्व वातावरणाचा अंदाज घेऊन, यू-ट्यूब आणि टेलिग्राम चॅनल्सना ऊत आला. सट्टा खेळायचा तर त्याचा अभ्यास करणंही आलेच. पीच रिपोर्ट, स्पीनर्सना अनुकूल की फास्टर्सना?  कमी लांबीचं मैदान असेल तर कोणता बॅट्समन अधिक स्फोटक बॅटिंग करेल? टॉस जिंकणारी टीम जिंकण्याची आकडेवारी वगैरे याचा अभ्यास असणार्‍या  काही मंडळींनी यू-ट्यूबवरून भविष्यवाणी सुरू केली. तिथं जिज्ञासू सट्टेबाजांच्या उड्या पडताहेत. लाखो सबस्क्रायबर असणारे टेलिग्राम चॅनल्स चालत आहेत. कोरोना, आर्थिक मंदीचं वातावरण आदीतून आलेला आर्थिक ताण किंवा ‘असेल माझा हरी तर देईल आणून खाटल्यावरी’ या उक्तीप्रमाणे, गेले तर 49 जातील पण मिळाले कोटभर रुपये तर जिंदगी सेट होईल या आशेतून रोजचे चारपाचशे रुपये घालवणारे बहाद्दरही आहेत. अर्थात, आजची परिस्थितीही काही फारशी चांगली नाही. त्यातून नैराश्य घालवण्यासाठी याकडे आशादायी म्हणूनही काहीजण पाहत असतील तर त्यांना दोष देण्याचंही काही कारण नाही. एकानं तर अख्खी दोनशे पानी फुलस्केप वही आणून कोणता फलंदाज कोणत्या गोलंदाजाला ठोकतो, तर कोणता गोलंदाज कुणाची विकेट काढतो याचं ‘अँनेलिसिस’च करून ठेवत आहे. त्या वहीत तो गुंतलेला असताना त्याच्या डोळ्यात जी चमक दिसते ती एखाद्या संशोधकाहूनही काही कमी नसते.एका मित्रानं सांगितलेला एक किस्सा. एक मॅच सुरू होती, शेवटचे पाचेक ओव्हर बाकी होत्या, तितक्यात एका मित्राचा त्याला फोन आला.तो म्हणाला, ‘उद्या आपण चारचाकी गाडी आणायला जायचंय, तयार राहा! ’हा आश्चर्यचकित झाला आणि त्यानं विचारला, ‘कुठून आले एवढे पैसे ?’  तर त्यानं अँप्लिकेशनवर पैसे लावल्याचं आणि आपण 15 लाख रुपये जिंकणार असल्याचं सांगितलं. झालं. यानं अर्ध्यापाऊण तासानं फोन केला तर तो बिचारा म्हणाला,   ‘गाडी कॅन्सल !’‘का रे? हरला का ?’  ‘नाही जिंकलो रे.’  ‘किती ?’‘साठ रुपये..!’ दुसर्‍या दिवशी माझ्या मित्रानं त्याच्या अतिउत्साही दोस्तास दुकानात मिळणारी खेळण्यातली वीस रुपयाची कार भेट दिली.हे काही प्रातिनिधिक किस्से आहेत. याच्याहून अनेक इरसाल कथा सध्या तरुण पोरं एकमेकांना सांगताना दिसतात.रोज संध्याकाळी सात वाजता टॉस होतो, कोणते खेळाडू खेळणार याची यादी येते. टेलिग्राम चॅनलवाले तज्ज्ञ दहाएक मिनिटात टीम देतात आणि खाली हॅश टॅग देतात.सुनो सबकी करो दिलकीआणि घरोघर बसलेले बरेच रिकामे तरुण हात लागतात पुन्हा एका फसव्या खेळात गुंतायला.