शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

3690 पत्रं, 700 हून अधिक ई-मेल्स आणि एकरंगी चर्चा!

By admin | Updated: February 25, 2016 21:49 IST

‘हुंडा’ घेणाऱ्या तरुण मुलग्यांसाठी ही चर्चा जाहीर केली, तेव्हा आम्हाला वाटलं होतं, की मुलं म्हणतील, ‘हद्दपारच व्हायला हवी ही प्रथा!’

‘हुंडा’ घेणाऱ्या तरुण मुलग्यांसाठी ही चर्चा जाहीर केली, तेव्हा आम्हाला वाटलं होतं, की मुलं म्हणतील, ‘हद्दपारच व्हायला हवी ही प्रथा!’चर्चा मुलांसाठी असली, तरी अर्थात मुलींना त्यात सहभागाची संधी होतीच; मात्र मुख्यत्वे हुंड्याच्या संदर्भात तो घेताना किंवा त्यास नकार देताना तरूण मुलांचं काय म्हणणं असतं, एरवी स्वतंत्र-बेडर असलेली ही तरुण मुलं हुंडा घेतानाच एकदम वडीलधाऱ्यांची आज्ञाधारक बाळं का होतात? असा प्रश्न आम्ही विचारला होता.तर मुलं म्हणाली, ‘काय चुकलं हुंडा घेतला तर? ग्रामीण भागात तर घ्यावच लागतो हुंडा!’आणि आश्चर्य म्हणजे काही मुलींच्या पत्रांमधूनही लग्नातल्या चैनचंगळीचं समर्थनच लपलेलं दिसत होतं.- आलेल्या पत्रांचा आणि ई-मेल्सचा ढीग उपसताना आमचे चेहेरे काळवंडत गेले, गोंधळात पडले आणि एका टप्प्यावर तर हुंड्याचं सरळसरळ समर्थन करणाऱ्या या इतक्या पत्रांचं, ई-मेल्सचं काय करावं, असा संभ्रमही पडला.- अखेरीस जे हाती लागलं ते, जसं आहे तसं वाचकांसमोर मांडायचं ठरवलं.पण, पुढला अंक वाचण्यापूर्वी काही खुलासे करून ठेवणं जरुरीचं आहे. ते असे :* हा शास्त्रीय पद्धतीने केलेला सॅम्पल सर्व्हे नाही. त्यामुळे यातून हाती लागलेल्या निरीक्षणांना निष्कर्षांचा दर्जा देण्याची घाई न केलेली बरी.* या अंकातली निरीक्षणं केवळ वाचकांनी लिहिलेल्या पत्रातून, ई-मेल्समधून दिसलेली वस्तुस्थिती आहे.* या चर्चेत बहुसंख्य मुलं पत्र लिहून, काही ई-मेलद्वारे सहभागी झाली. बहुसंख्य मुलं आणि मुलीही मुख्यत्वे ग्रामीण, निमशहरी आणि छोट्या शहरांतली आहेत. त्यातुलनेने मोठ्या, मेट्रो शहरातील पत्रांचं प्रमाण या चर्चेत कमी दिसलं. त्यामुळे हे सर्वसमावेशक चित्र नाही.* ज्यांना जबरदस्ती हुंडा द्यावा लागला किंवा हुंड्याची सक्ती अनुभवावी लागते आहे, ग्रामीण भागात ‘हुंडा’ या जटिल समस्येला सामोरं जावं लागत आहे, अशाच मुलींची आणि मुलांचीही बहुतांश पत्रं या चर्चेत वाचायला मिळाली. नव्या आणि आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार करणारे तरुण-तरुणी मोठ्या संख्येने आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. पण, त्यांचा सहभाग या चर्चेत नाही.* या अंकातलं हुंड्याबद्दलचं सामाजिक वास्तव हे काहीसं एकरंगी चित्र आहे (म्हणजे असावं); पण हाही रंग अद्याप टिकून आहे एवढे मात्र आॅक्सिजनची टीम खात्रीने सांगू शकते.