शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना 3 इंटर्नशीप मस्ट!

By meghana.dhoke | Published: August 02, 2017 5:51 PM

येत्या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इण्टर्नशिप करणं सक्तीचं असून, त्यांना योग्य इण्टर्नशिप मिळावी म्हणून प्रयत्न करणं महाविद्यालयं आणि शिक्षणसंस्थांसाठीही बंधनकारक.

ठळक मुद्देफक्त 1 % मुलं करतात इण्टर्नशिप, बाकीचे सुटीत आराम करतात.इंजिनिअर्सची रोजगारक्षमता वाढून कौशल्यविकासासाठी प्रत्यक्ष अनुभवाची गरज.इंजिनिअर्सची गुणवत्ता वाढावी म्हणून सरकारचा प्रयत्न

दरवर्षी 8 लाख तरुण इंजिनिअरिंगची पदवी घेवून नोकरीच्या बाजारात उतरतात. आणि त्यापैकी फक्त 40%  इंजिनिअर्सना नोकर्‍या मिळतात. आणि दुर्देवानं 60 %  इंजिनिअर्स बेरोजगार राहतात. हे आपल्या देशातलं वास्तव सरकारनेही मान्य केलं असून या इंजिनिअर्सची गुणवत्ता वाढावी, त्यांचे स्किल्ससेट उत्तम व्हावेत आणि त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा म्हणून येत्या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंग करणार्‍या सर्व विद्याथ्र्याना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणं अर्थात इण्टर्नशिप करणं शासनानं सक्तीचं केलं आहे. पदवीच्या प्रवासात किमान तीन वेळा 6 ते 8आठवडय़ांची ही इण्टर्नशिप करणं प्रत्येक विद्याथ्र्याला सक्तीचं करण्यात आलं आहे. आज देशात फक्त 1 % तरुण समर इण्टर्नशिप करतात, बाकीचे मोठी सुटी घरात आरामात बसून काढतात आणि नोकरीच्या बाजारात उतरले की त्यांना ना-लायक ठरवून कंपन्या नोकर्‍या देत नाहीत.

देशभरातल्या कॉलेजातून बाहेर पडणार्‍या इंजिनिअर्सची गुणवत्ता हा मोठा चिंतेचा विषय आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारनेही हे मान्य केलं आहे की, इंजिनिअर्सची गुणवत्ता ही अत्यंत कमी असून ती वाढावी यासाठी निश्चित आणि नियोजित प्रयत्न करणं गरजेचं आहे. केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 24 जुलै 2017 रोजी संसदेत केलेल्या निवेदनानुसार येत्या म्हणजेच 2017-18 याच शैक्षणिक वर्षापासून विद्याथ्र्याना इण्टर्नशिप करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे मुलांनीच काय ती इण्टर्नशिप शोधावी असं सरकारला अपेक्षित नाही. उलट याकामी सर्व महाविद्यालयांना जबाबदार धरण्यात येणार असून आपल्या विद्याथ्र्याना चांगल्या इण्टर्नशिप मिळाव्यात,त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा म्हणून महाविद्यालयं आणि संस्थांनाही विद्याथ्र्याना इण्टर्नशिप मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.

ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेकिAलक एज्युकेशन  म्हणजेच एआयसीटीई या तांत्रिक शिक्षणासाठी सर्वोच्च असलेल्या संस्थेनंही याप्रकारच्या इण्टर्नशिपची गरज व्यक्त केली आहे.  एआयसीटीई स्वतर्‍ संस्थांना योग्य कंपन्यात इण्टर्नशिप मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न करत आहे. त्यासाठीच्या व्यवस्था तयार करण्यात येत आहेत.  लिंकडीन, इण्टर्नशाळा यासारख्या समाजमाध्यमांना, पोर्टल्सना त्यात सहभागी करुन घेतलं जात आहे.

 एआयसीटीईच्याच 2016 या शैक्षणिक वर्षाच्या आकडेवारीनुसार देशभरात 10,328 तंत्रशिक्षण संस्था असून   15.87 लाख विद्यार्थी तिथं शिकतात. त्यापैकी फक्त 6.96लाख विद्याथ्र्यानाच कॅम्पस मुलाखतींमध्ये नोकर्‍या मिळाल्या.

 एआयसीटीईच्या वार्षिक अहवालानुसार पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत तंत्रशिक्षण संस्थांमध्ये विविध कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जाणार आहेत. इंजिनिअर्सची गुणवत्ता वाढीस लागावी आणि त्यांना अधिक नोकरीक्षम बनवावे, अधिक रोजगार उपलब्ध व्हावेत म्हणून हे प्रयत्न केले जात असल्याचे  एआयसीटीईचे म्हणणे आहे.

 एआयसीटीईचा अहवाल म्हणतो की, येत्या 3 वर्षात किमान 10 लाख उत्तम तरुण इंजिनिअर्स तयार करणं हा या योजनेचा भाग आहे. आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव.  कौशल्य विकास आणि इण्टर्नशिपमुळे मिळणारा औद्योगिक कामाचा अनुभव हे सारं तरुण इंजिनिअर्ससाठी महत्वाचं ठरेल अशी आशा आहे.