शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

झिम्बाब्वेने केलेला पराभव जिव्हारी, मॅथ्यूजचा कर्णधारपदाचा राजीनामा

By admin | Updated: July 12, 2017 11:48 IST

झिम्बाब्वेविरोधातील एकदिवसीय मालिकेत 3-2 ने पराभव झाल्यानंतर अँजेलो मॅथ्यूजने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे

ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. 12 - झिम्बाब्वेविरोधातील एकदिवसीय मालिकेत 3-2 ने पराभव झाल्यानंतर अँजेलो मॅथ्यूजने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मॅथ्यूज तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे. झिम्बाब्वेविरोधात झालेला पराभव आपल्या करिअरमधील सर्वात वाईट पराभव असल्याचं सांगत मॅथ्यूजने राजीनामा दिला आहे. त्याने आपला निर्णय निवड समितीला कळवला आहे. याआधी इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील खराब प्रदर्शनानंतर श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम फोर्ड यांनीही राजीनामा दिला होता. 
 
आणखी वाचा
 
मॅथ्यूजच्या आपल्या नेतृत्वात 34 कसोटी, 98 एकदिवसीय आणि 12 टी20 सामने खेळले आहेत. 2013 मध्ये महेला जयवर्धनेने राजीनामा दिल्यानंतर मॅथ्यूजकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. 25 व्या वर्षी कर्णधारपद मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. त्याच्या कार्यकाळातील जास्तीत जास्त मर्यादित ओव्हर्स सामने खेळावे लागले. कसोटीमध्ये मॅथ्यूज चांगली कामगिरी करु शकला नाही. 2014 मध्ये इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी मालिकेत मॅथ्यूजने महत्वाची भूमिका निभावली होती. तसंच गतवर्षी ऑस्टेलियाचा  व्हाईवटवॉश करत पराभवाची धूळ चारली होती.  
 
मॅथ्यूजने 34 कसोटी सामन्यांचं नेतृत्व केलं, ज्यापैकी 13 सामन्यात श्रीलंकेला विजय मिळाला, तर 15 सामन्यात पराभव पत्करावा लागला. मॅथ्यूजच्या नेतृत्वात श्रीलंकेने 47 वन डे सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर 46 पराभव झाले. टी-20 मध्ये मॅथ्यूजच्या नेतृत्तात श्रीलंकेने चार विजय मिळवले, तर सात पराभव झाले.
 
झिम्बाब्वेने मालिका जिंकली
ऑफ स्पिनर सिकंदर रजाच्या शानदार फिरकीनंतर सलामीवीर हॅमिल्टन मसाकद्जा याने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर झिम्बाब्वेने पाचव्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात यजमान श्रीलंकेला ३ विकेट्सने नमवून मालिका ३-२ अशी जिंकली. विशेष म्हणजे, झिम्बाब्वेने गेल्या आठ वर्षात पहिल्यांदा विदेशामध्ये मालिका जिंकली.
 
श्रीलंकेन दिलेल्या २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने हॅमिल्टनच्या ७३ धावांच्या खेळीच्या जोरावर बाजी मारली. हॅमिल्टनने ८६ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह आपली खेळी सजवली. त्याच्याशिवाय सोलोमन मायर (४३) याच्यासह ९२ धावांची सलामी करत हॅमिल्टनने संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. यानंतर हॅमिल्टन - तारिसाई मुसाकांदा (३७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करुन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. झिम्बाब्वेने फलंदाजांच्या जोरावर ३८.१ षटकात ७ बाद २०४ धावा काढल्या. सामनावीर ठरलेल्या रजाने अंतिम क्षणी महत्त्वपुर्ण खेळी करताना २७ चेंडूत एक चौकार व दोन षटकारांसह नाबाद २७ धावा चोपल्या. तत्पूर्वी, रजाच्या (३/२१) भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचा डाव मर्यादित राहिला. ग्रीम केमरनेही (२/२३) चांगला मारा करुन लंकेच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. सलामीवीर धनुष्का गुणतिलका (५२) आणि असेला गुणरत्ने (नाबाद ५९) यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना छाप पाडण्यात अपयश आले. एकवेळ लंकेची ४२व्या षटकात ८ बाद १५३ धावा अशी अवस्था होती. परंतु, गुणरत्ने आणि दुष्मंता चमीरा (नाबाद १८) यांनी नवव्या विकेटसाठी नाबाद ५० धावांची भागीदारी करुन संघाला दोनशेच्या पुढे मजल मारुन दिली होती.