शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

झिम्बाब्वे, अफगाणिस्तानचे मुख्य फेरी गाठण्याचे लक्ष्य

By admin | Updated: March 10, 2016 03:26 IST

आयसीसी टी-२० विश्वचषक पात्रता फेरीत ‘ब’ गटात सलामी लढत जिंकणारे झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ गुरुवारी दुसऱ्या विजयांसह मुख्य फेरीत धडक देण्याच्या इराद्याने उतरणार आहेत

किशोर बागडे / जयंत कुलकर्णी, नागपूर आयसीसी टी-२० विश्वचषक पात्रता फेरीत ‘ब’ गटात सलामी लढत जिंकणारे झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ गुरुवारी दुसऱ्या विजयांसह मुख्य फेरीत धडक देण्याच्या इराद्याने उतरणार आहेत.दुसरीकडे हाँगकाँग व स्कॉटलंड संघासाठी दुसरी लढत ‘करा किंवा मरा’ अशीच असेल. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये हे दोन्ही सामने दुपारी ३ आणि सायंकाळी ७.३० वाजेपासून रंगतील.मंगळवारी तुलनेत बलाढ्य मानल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेला हाँगकाँगने झुंजविल्याने केवळ १४ धावांनी विजय मिळविता आला. अफगाणिस्तान संघदेखील स्कॉटलंडविरुद्ध काठावर पास झाला नाही. दोन सामने जिंकणारे २ संघ मुख्य फेरीत जाणार असून पराभूत संघ बाहेर पडणार आहेत. त्यामुळे हाँगकाँग आणि स्कॉटलंड यांच्यासाठी आजचे सामने महत्त्वाचे असतील. हाँगकाँग आणि स्कॉटलंड संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे पण अनुभवात हे संघ कमी पडतात. टी-२० मध्ये कुठे आणि कधी फलंदाजी- गोलंदाजीत कमाल करायची हे त्यांनाअद्याप अवगत झाले नसल्याचे कालच्या सामन्यादरम्यान प्रकर्षाने जाणवले. झिम्बाब्वे संघ समतोल वाटतो पण त्यांनाही क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्यास वाव आहे. मोक्याच्या क्षणी झेल सोडणे आम्हाला महागडे ठरू शकले असते पण थोडक्यात बचावलो, अशी प्रतिक्रिया वुसी सिबांडा याने दिली होती. सलामी लढतीत अर्धशतक करणारा अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजाद, कर्णधार असगर स्तानिकजई यांना अन्य सहकाऱ्यांकडून आज मोठ्या कामगिरीची अपेक्षा बाळगावी लागेल. क्रिकेट बेभरवशाचा खेळ आहे. कुठला संघ संधीचे सोने करण्यात यशस्वी होतो, हे उद्याच पहायला मिळेल.