शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

यू मुंबाचा धडाकेबाज विजय

By admin | Updated: February 24, 2016 03:48 IST

स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या बलाढ्य यू मुंबाने पुन्हा एकदा आपला हिसका दाखवून बंगाल वॉरियर्सला ३०-१७ असे लोळवले. तर, यानंतर झालेल्या अत्यंत एकतर्फी लढतीत पटना

- रोहित नाईक,  जयपूरस्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या बलाढ्य यू मुंबाने पुन्हा एकदा आपला हिसका दाखवून बंगाल वॉरियर्सला ३०-१७ असे लोळवले. तर, यानंतर झालेल्या अत्यंत एकतर्फी लढतीत पटना पायरेट्सने जयपूर पिंक पँथर्सचा ४७-२४ असा फडशा पाडला.सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात मुंबईकरांनी भक्कम बचावाला वेगवान आक्रमणाची साथ देताना बंगाल वॉरियर्सच्या आव्हानातली हवा काढली. कर्णधार अनूप कुमारने सामन्यातील पहिल्याच चढाईत खाते उघडल्यानंतर मुंबईकरांनी तुफान खेळ करून आठव्याच मिनिटाला बंगलावर पहिला लोण चढवला. यू मुंबाच्या धडाक्यापुढे बंगालचा कोणताही खेळाडू चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे कर्णधार नीलेश शिंदेच्याही चढाया अपयशी ठरला. मध्यंतराला मुंबईने १७-६ अशा १५ गुणांच्या एकतर्फी आघाडीने वर्चस्व राखले.यानंतरही मुंबईचा धडाका कमी झाला नाही. रिशांक देवाडिगा व अनूपच्या खोलवर चढाया आणि फझेल अत्राचली व विशाल माने यांच्या मजबूत पकडींच्या जोरावर यू मुंबाने २६व्या मिनिटाला बंगालवर दुसरा लोण चढवून २१-९ अशा १२ गुणांच्या मोठ्या आघाडीसह सामन्याचे चित्र स्पष्ट केले. अत्राचलीच्या पकडीपुढे बंगालचा प्रत्येक चढाईपटू दबावाखाली खेळताना दिसला. एक वेळ बंगालने बचावात्मक पवित्रा घेऊन मुंबईकरांना तिसऱ्या चढाईत पकडण्याची रणनीती आखली. मात्र, मुंबईच्या मोठ्या आघाडीमुळे त्यांची योजना अपयशी ठरली. मुंबईवर लोण चढवण्याची संधीही बंगालने साधली होती; मात्र मुंबईच्या भक्कम बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. अखेरीस मुंबईकरांनी शानदार विजयावर शिक्का मारला. बंगालकडून जँग कून लीचा अष्टपैलू खेळ आणि नीलेशच्या पकडी चमकदार ठरल्या. मुंबईकडून चढाईत पुन्हा एकदा रिशांकने निर्णायक खेळ करताना ६, तर अनूपने ५ गुण मिळविले. बचावात फझेल व विशाल यांनी अनुक्रमे ६ व ३ गुण वसूल केले.यानंतर पटना पायरेट्सने यजमान जयपूर पिंक पँथर्सला ४७-२४ असे लोळवले. घरच्या मैदानावरील शेवटचा सामनाही हरल्याने जयपूरच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. तुफानी हल्ला चढवताना पटनाने सुरुवातीला १०-० अशी जबरदस्त आघाडी घेतली. यजमानांना पहिल्या गुणासाठी ७व्या मिनिटापर्यंत वाट पाहावी लागली. मध्यंतराला २७-५ असा दबदबा राखलेल्या पटनाने जयपूरवर तब्बल ४ लोण चढवले. तर, जयपूरने पटनावर एक लोण चढवला; मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पटनाला अर्धशतकापासून रोखल्याचे एकमेव समाधान जयपूरला मिळाले.बंगालविरुद्धच्या विजयात संघातील प्रत्येकाने सर्वोत्तम खेळ केला. यापुढेही विजयी मालिका कायम राखण्याचा निर्धार आहे. आमचे संरक्षण निर्णायक ठरले आणि याचे श्रेय फझेल अत्राचलीला द्यावे लागेल. त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला.- अनूप कुमार, कर्णधार, यू मुंबा