ब्युनोस आयरिस : भारताच्या प्रविण चित्रावेलने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मुलांच्या तिहेरी उडी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. त्याने दुसऱ्या टप्प्यात 15.68 मीटर उडी घेताना हे पदक निश्चित केले. युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे 12 वे पदक ठरले. भारताने एकूण 3 सुवर्ण, 8 रौप्य आणि 1 कांस्यपदकाची कमाई केली आहे.
Youth Olympic Games 2018 : प्रविण चित्रावेलने जिंकले कांस्य, भारताच्या खात्यात 12 पदकं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 09:02 IST