शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

युवा खेळाडूंमुळे वरिष्ठ खेळाडूंवर दडपण नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 06:12 IST

संदीप नरवाल : घरच्या मैदानावर खेळण्यास उत्सुक

रोहित नाईक मुंबई : ‘कबड्डीमध्ये आज खूप मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. एक खेळाडू अपयशी ठरला, तर त्याची जागा भरून काढायला दुसरा खेळाडू सज्ज असतो. अनेक युवा खेळाडू आज दमदार खेळ करत आहेत. असे असले तरी वरिष्ठ खेळाडूंवर कोणतेही दडपण नाही,’ असे मत यू मुंबाचा उपकर्णधार संदीप नरवाल याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सत्रात शनिवारपासून मुंबईतील साखळी सामन्यांना सुरुवात होईल. या वेळी घरच्या मैदानावर खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगताना संदीप म्हणाला की, ‘घरच्या मैदानावर खेळण्याची उत्सुकता आहे. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची खात्री आहे आणि घरच्या प्रेक्षकांपुढे जिंकण्याची मजाच वेगळी असते. त्यासाठी आम्ही तयार आहोत. ’ घरच्या मैदानावर मुंबईकर पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पुणेरी पलटणला सामोरे जातील. विशेष म्हणजे याआधी ५ मोसममध्ये यू मुंबाकडून खेळलेला अनुप कुमार यंदा पुणेरी पलटणचा प्रशिक्षक आहे, तर गेल्या मोसमात पुण्याकडून खेळलेला संदीप यंदा मुंबईचा उपकर्णधार आहे. याविषयी त्याने म्हटले की, ‘नक्कीच आम्ही अनुप कुमारच्या मार्गदर्शनाखालील संघाविरुद्ध खेळू. पण प्रशिक्षक सर्व काही नसतो. प्रशिक्षक मैदानात केवळ ३० सेकंद उतरतो आणि आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करतो, पण प्रत्यक्ष खेळ खेळाडूंनाच करायचा असतो. त्यामुळे विशेष फरक पडणार नाही.’

त्याचप्रमाणे, ‘आज अनेक ज्युनिअर खेळाडू संधी मिळताच आपली छाप पाडत आहेत. यामुळे खेळामध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली असली तरी, वरिष्ठ खेळाडूंना याचे काहीच दडपण नाही. तसेही जर अशा प्रकारचे दडपण हाताळता आले नाही, तर कोणताही खेळाडू यशस्वी होऊ शकणार नाही,’ असेही संदीप म्हणाला.

फिजिओचा सल्ला मोलाचा!कबड्डीमध्ये कधीही आणि कुठेही दुखापती होऊ शकतात. त्याकडे लक्ष देऊनच खेळावे लागते. जेव्हा आम्ही मॅटवर खेळतो, तेव्हाच आम्ही मानसिकरीत्या संभाव्य दुखापतीकडे लक्ष देऊनच खेळतो. दुखापती कधीही होऊ शकतात. यासाठी वेगळ्याप्रकारे आम्ही तयारी करतो. प्रत्येक वेळी फिजिओच्या सल्ल्यानुसारच कामगिरी करतो. - संदीप नरवाल

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डी