शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

आपल्याकडे अजूनही सोयीसुविधांची कमतरता

By admin | Updated: August 26, 2016 03:42 IST

आपल्या देशात टेबल टेनिससाठी सोयीसुधांची अजूनही कमी आहे.

रोहित नाईक,

मुंबई- आपल्या देशात टेबल टेनिससाठी सोयीसुधांची अजूनही कमी आहे. खेळाडूंना अनेकदा चांगल्या सोयींसाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे जावे लागते. यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. संघटनेलाही एखादी स्पर्धा आयोजित करण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आणि अश्या समस्यांना सामोरे जात आपले खेळाडू आॅलिम्पिकपर्यंत धडक मारतात, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी दिग्गज टेबल टेनिसपटू कमलेश मेहता यांनी ‘लोकमत’कडे दिली.रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय टेटे खेळाडूंच्या कामगिरीविषयी मेहता म्हणाले, ‘‘भारतीयांची कामगिरी नक्कीच निराशाजनक झाली. याची कल्पना खेळाडूंनाही आहे. विशेष म्हणजे सौम्यजीत घोषकडून अपेक्षा होत्या. त्याचा ड्रॉदेखील इतरांच्या तुलनेत थोडा चांगला होता. परंतु, तो दबावाखाली आला. एकूणंच भारतीयांकडून याहून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, कारण याआधीच्या स्पर्धांत त्यांनी चमकदार कामगिरी केली होती.’’टटेमध्ये भारताची सर्व मदार अनुभवी शरथ कमलवर होती. जर्मनीत वास्तव्यास असलेल्या कमलबाबत मेहता यांनी सांगितले की, ‘‘कमलकडून नक्कीच खूप अपेक्षा होता. तो जरी सुरुवातीलाच पराभूत झाला असला, तरी त्यादिवशी त्याचा खेळ उत्कृष्ट झाला होता. त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचे अधिक कौतुक करावे लागेल. कारण, कमलचा प्रतिस्पर्धी शानदार खेळला. तो दिवस कमलचा नव्हता.’’त्याचप्रमाणे, पराभवाने खचून जाऊ नका असा संदेश नवोदितांना देताना मेहना यांनी सांगितले की, ‘‘यंदा आॅलिम्पिकमध्ये मनिका बत्रासारखे अनेक युवा खेळाडू सहभागी झाले होते. भलेही त्यांना अपयश आले असेल, पण पुढे अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्यांना खेळायचे आहेत. त्यामुळे यासाठी आता त्यांनी तयारी करावी. भारतात पुरुष व मुले अनेकदा टेटे स्पर्धांसाठी विदेशात जात असतात. मुलींच्या बाबतीत हे प्रमाण कमी आहे आणि सध्या हे चित्र हळूहळू बदलत आहे. शिवाय संघटनेकडूनही मिळणाऱ्या मदतीचा फायदा घेत महिला व मुलींनी चमकदार कामगिरी करावी.’’त्याचप्रमाणे, ‘‘सोयीसुविधांमध्ये वाढ, कॉर्पोरेट जगताकडून आर्थिक पाठबळ आणि सरकारकडून मदत मिळाल्यास टेटे खेळ अधिक बहरु शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येणे आवश्यक आहे,’’ असेही मेहता यांनी यावेळी सांगितले.>सगळे म्हणतात आपण आॅलिम्पिकमध्ये खूप मागे आहोत. मी मान्यही करतो. पण हे चित्र बदलत असून साक्षी, सिंधूसारख्या खेळाडूंनी याची सुरुवात केली आहे. अशा खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पण आपण केवळ आपल्या कमजोरीकडे बोट दाखवत राहिलो, तर कधीच पुढे जाणार नाही. यासाठी सर्वप्रथम स्वत:पासून बदल केला पाहिजे. त्याशिवाय हे चित्र बदलणार नाही.- कमलेश मेहता