शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

'माझ्यासोबत रूम शेअर करावी लागेल..', प्रशिक्षकाने बळजबरी केली, महिला खेळाडूने सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 16:37 IST

Indian female cyclist sexually abused : महिला सायकलपटूचे पत्रही समोर आले असून, त्यात तिने प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत.

Indian female cyclist sexually abused : एका महिला सायकलपटूने मुख्य प्रशिक्षक आरके शर्मा यांच्यावर 'अयोग्य वर्तन' केल्याचा आरोप केल्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) स्लोव्हेनियाला प्रशिक्षणासाठी आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी गेलेल्या संपूर्ण भारतीय संघाला परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, महिला सायकलपटूचे पत्रही समोर आले असून, त्यात तिने प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत.महिला सायकलपटूने पत्रात काय खुलासा केला?भारतीय महिला सायकलपटूने लिहिलेल्या पत्रात प्रशिक्षक आरके शर्मा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 15 मे ते 14 जून या कालावधीत सायकलिंग प्रशिक्षण शिबिरासाठी आम्हाला स्लोव्हेनियाला जायचे होते, तेव्हा सर्व तयारी सुरु झाली होती, निघायच्या तीन दिवस आधी प्रशिक्षक आर के शर्मा यांनी मला फोन केला आणि सांगितले की, तिला त्यांच्यासोबत रूम शेअर करावा लागेल. हे ऐकून मला धक्काच बसला आणि खूप तणावात गेले, मी फिजिओशीही याबाबत बोलले.महिला सायकलपटूने सांगितले की, दोन दिवसांनी मी स्लोव्हेनियाला जाण्यासाठी फ्लाइट पकडून तिथे काही वेगळी व्यवस्था होईल असे वाटले. पण हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर मला वेगळी खोली नाकारण्यात आली. प्रशिक्षक आरके शर्मा तिच्याशी उद्धटपणे बोलले आणि तिला धमकावले की, त्यांना वाटलं तर ते आला शिबिरातही येणार नाही. मात्र, नंतर मला वेगळी खोली देण्यात आल्याने प्रशिक्षक चांगलेच संतापले आणि त्यांनी माझे करिअर संपवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.पुढे, महिला खेळाडूने सांगितले की, 19 मे रोजी प्रशिक्षकाने तिला मसाजसाठी खोलीत बोलावले, इतकेच नाही तर 29 मे रोजी प्रशिक्षक तिच्या खोलीत बळजबरीने घुसला आणि बळजबरी सुरू केली. त्यानंतर मी स्वतःची काळजी घेतली आणि नंतर या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर मी परत येण्याचा निर्णय घेतला, मी परत येत असतानाही प्रशिक्षकाने तिला धमकावले.संपूर्ण भारतीय टीम परत बोलावण्यात आलीभारतीय संघात पाच पुरुष आणि एक महिला सायकलपटू आहे आणि आधीच्या वेळापत्रकानुसार ते स्लोव्हेनियाहून १४ जूनला परतणार होते. SAI ने यापूर्वीच आरोप करणाऱ्या सायकलपटूला परत बोलावले आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी चौकशी समिती स्थापन केली आहे.सायकल फेडरेशन ऑफ इंडियाचे (CFI) अध्यक्ष ओंकार सिंग यांनी पीटीआयला सांगितले की, SAI ने सध्याचा दौरा मध्येच संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे सिंग म्हणाले, "एसएआयच्या अधिकाऱ्याने बुधवारी सकाळी सीएफआयला सांगितले आहे प्रशिक्षक आरके शर्मा यांच्यासह संपूर्ण संघाला स्लोव्हेनियामधून ताबडतोब परत बोलावण्यात येईल,". तसेच SAI ने प्रशिक्षक शर्मा यांना लवकरात लवकर परतण्यासाठी वेगळा संदेश पाठवला होता. या प्रकरणी SAI ने तपासासाठी आधीच एक समिती स्थापन केली आहे, जी प्रकरणाच्या प्रत्येक पैलूवर जाऊन दोन्ही बाजू ऐकून घेईल.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळCyclingसायकलिंग