शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश सरकारनं टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्यांसह राज्यातील खेळाडूंसाठी उघडली तिजोरी, भव्य सत्कार समारंभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 12:10 IST

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. भालाफेकपटू नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासातील १२५ वर्षांतील हे अॅथलेटिक्समधील पहिलेच पदक ठरले. २००८नंतर पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रगीत वाजले. वेटलिफ्टर मीराबाई चानू व कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांनी रौप्यपदक जिंकेल, तर बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, बॉक्सर लवलिना बोरगोईन, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पुरुष हॉकी संघानं कांस्यकमाई केली.  टोक्योतून परतलेल्या या पदकविजेत्यांसह राज्यातील खेळाडूंसाठी उत्तर प्रदेश सरकारनं भव्य सोहळ्याचं आयोजन केलं होतं. लखनौ येथील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात सुवर्णपदक विजेत्या नीरजला दोन कोटींचा धनादेश देण्यात आला. याशिवाय रवि दहिया व मीराबाई चानू या रौप्यपदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी दीड कोटी आणि पी व्ही सिंधू, लवलिना, बजरंग यांच्यासह पुरुष हॉकी संघातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी एक कोटी बक्षीस दिलं गेलं. 

Video : नीरज चोप्रा ऑलिम्पिक पदक विजेता आहे, बिग बॉस विजेता नाही; मलिष्कावर खवळले नेटिझन्स!

टोक्योत चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला ५० लाखांचं बक्षीसही योगी सरकारनं दिले. यासह मीराबाई चानूचे प्रशिक्षक उत्तर प्रदेश येथील गाजियाबाद येथील विजय शर्मा यांना १० लाख, पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकांना २५ लाख व साहाय्यक सदस्यांना प्रत्येकी १०-१० लाख दिले गेले. महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक व साहाय्यक सदस्यांना प्रत्येकी १० लाख दिले गेले. कुस्तीपटू दीपक पूनिया व गोल्फपटू अदिती अशोक यांना प्रत्येकी ५० लाख दिले गेले. टोक्योत सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशमधील १० खेळाडूंना प्रत्येकी २५ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.  

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश