शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

योगेश्वरचे ऐतिहासिक सुवर्ण

By admin | Updated: September 29, 2014 06:39 IST

स्टार मल्ल योगेश्वर दत्तने रविवारी १७ व्या आशियाई स्पर्धेत भारताला चौथे सुवर्ण मिळवून दिले, तर खुशबीर कौरने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकाविले

इंचियोन : स्टार मल्ल योगेश्वर दत्तने रविवारी १७ व्या आशियाई स्पर्धेत भारताला चौथे सुवर्ण मिळवून दिले, तर खुशबीर कौरने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकाविले. खुशबीर चालण्याच्या शर्यतीत पदक पटकाविणारी भारतीय पहिली महिला अ‍ॅथलिट ठरली. भारताने पदकतालिकेत नवव्या स्थानावर उडी घेतली. याव्यतिरिक्त टेनिसपटूंनी तीन कांस्य पदकांची कमाई केली, तर धावपटू पूवम्माने महिलांच्या ४०० मीटर दौड स्पर्धेत, तर पुरुष विभागात राजीव अरोकियाने कांस्यपदक पटकाविले. मंजू बालाने महिलांच्या हॅमर थ्रोमध्ये कांस्यपदकाचा मान मिळविला.टेनिसमध्ये युकी भांबरीने पुरुष एकेरीव्यतिरिक्त दिविज शरणच्या साथीने पुरुष दुहेरीमध्ये कांस्यपदक पटकाविले, तर स्टार खेळाडू सानिया मिर्झा व प्रार्थना ठोंबरे जोडीने महिला दुहेरीत कांस्य पदकाचा मान मिळविला. शनिवारी १० पदके पटकाविणाऱ्या भारतासाठी रविवारचा दिवसही समाधानकारक ठरला. भारत या स्पर्धेत अव्वल १० मध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला. आज, रविवारी आठ पदकांची कमाई करणारा भारत पदकतालिकेत नवव्या स्थानी आहे. त्यात चार सुवर्ण, पाच रौप्य व २६ कांस्यपदकांचा समावेश आहे. चीनने अव्वल स्थान कायम राखले आहे. १०५ सुवर्ण, ६३ रौप्य व ४८ कांस्य पदकांसह एकूण २१६ पदकांची कमाई करीत चीन अव्वल स्थानावर आहे. यजमान दक्षिण कोरिया (४२ सुवर्ण, ४८ रौप्य, ४७ कांस्य) दुसऱ्या, तर जपान (३४ सुवर्ण, ४६ रौप्य व ४६ कांस्य) तिसऱ्या स्थानी आहे. भारताला आगामी दिवसांमध्ये अधिक पदकांची आशा आहे. बॉक्सिंगमध्ये महिला विभागात भारतीय बॉक्सर्सनी तीन गटांत पदक पक्के केले आहे. टेनिसमध्ये सनम सिंग व साकेत माइनेनी यांनी पुरुष दुहेरीच्या, तर साकेत व सानिया यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारताना किमान रौप्यपदक निश्चित केले आहे. कुस्ती : योगेश्वरला सुवर्णयोगेश्वर दत्त आजचा हिरो ठरला. २००६ मध्ये कांस्यपदक पटकाविणाऱ्या योगेश्वरने यावेळी सुवर्णपदकावर नाव कोरले. आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर उपांत्य फेरीच्या लढतीत पिछाडीवर होता, पण अखेरच्या क्षणी चमकदार कामगिरी करीत योगेश्वर अंतिम फेरीत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला. अंतिम फेरीत योगेश्वरने ताजिकिस्तानच्या जालिमखान युसुपोव्हचा पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले. टेनिस : साकेतला दुहेरी सुवर्ण पटकाविण्याची संधीसाकेत मयनेनीने पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारताना दुहेरी सुवर्णपदक पटकाविण्याच्या दिशेने वाटचाल केली. सानिया मिर्झासह अन्य भारतीय टेनिसपटूंनी आज आशियाई स्पर्धेत तीन कांस्यपदकांची कमाई केली. टेनिसमध्ये पुरुष एकेरीत युकी भांबरीने भारताला एकमेव पदक मिळवून दिले. युकीला उपांत्य फेरीत जपानच्या योशिहितो निशिओकाविरुद्ध ६-३, २-६, १-६ ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सानिया मिर्झा व प्रार्थना ठोंबरे यांनी महिला दुहेरीमध्ये कांस्यपदक पटकाविले. पाचव्या मानांकित भारतीय जोडीला उपांत्य फेरीत चिनी ताइपेच्या चिन वेई चान व सु वेई सिहिन या दुसऱ्या मानांकित जोडीविरुद्ध ७-६, २-६, ४-१० ने पराभव स्वीकारावा लागला. पुरुष दुहेरीमध्ये युकी व त्याचा सहकारी दिविज शरण यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत युकी-दिविज शरण यांना योंगक्सू लिम व हियोन चुंग यांच्याविरुद्ध ६-७, ७-६, ९-११ ने पराभव स्वीकारावा लागला. साकेत व समन सिंग यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्य लढतीत थायलंडच्या सांचेई रतिवातना व सोनचाट रतिवातना या जोडीचा ४-६, ६-३, १०-६ ने पराभव केला. त्यानंतर साकेतने अनुभवी सानिया मिर्झाच्या साथीने चीनच्या झी झेंग व झे झांग यांचा ६-१, ६-३ ने पराभव करीत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिरंदाजी : महिला संघ पराभूतभारतीय महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाला कांस्यपदकाच्या लढतीत शूटआॅफमध्ये जपानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.कॅनोइंग, कयाकिंग : भारतीयांची चमकदार कामगिरीभारतीय खेळाडूंनी कॅनोइंग व कयाकिंग स्पर्धेत चमक दाखविली. ११ पैकी ६ गटांत अंतिम फेरीत स्थान मिळविले. भारताने पुरुष विभागात पाच, तर महिला विभागात एका गटात अंतिम फेरीत स्थान मिळविले. गौरव तोमरने पुरुषांच्या १००० मीटर सी-१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अव्वलस्थान पटकाविले, तर एस. अजित कुमार व राजीव रावत यांनी पुरुषांच्या १००० मीटर सी-२ मध्ये दुसरे स्थान पटकाविले. हँडबॉल : निराशाजनक कामगिरीहँडबॉलमध्ये भारतीय पुरुष व महिला संघांना क्लासिफिकेशन लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला. पुरुष संघाला १३ व १४ व्या स्थानासाठी झालेल्या लढतीत संयुक्त अरब अमिरातविरुद्ध २५-३२ ने पराभव स्वीकारावा लागला, तर महिला संघाला पाचव्या व आठव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत उझवेकिस्तानविरुद्ध ४४-२६ ने पराभव स्वीकारावा लागला. महिला संघाला आता सातव्या-आठव्या स्थानासाठी ३० सप्टेंबरला खेळावे लागणार आहे.व्हॉलिबॉल : पुरुष संघ पराभूतव्हॉलिबॉल स्पर्धेत पुरुष संघाला ‘ई’ गटाच्या प्ले आॅफ लढतीत यजमान दक्षिण कोरियाविरुद्ध २२-२५, २५-२७, १८-२५ ने पराभव स्वीकारावा लागला. महिला बास्केटबॉल संघाला उपांत्यपूर्व फेरीत चीनविरुद्ध ३७-७० ने पराभव स्वीकारावा लागला.कबड्डीत भारताची चमकदार सलामीकबड्डी स्पर्धेत भारतीय संघांनी उभय गटांमध्ये अपेक्षेप्रमाणे चमकदार सुरुवात केली. पुरुष व महिला संघांनी आपापल्या गटात सलामी सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. महिला संघाने ‘अ’ गटात बांगलादेशवर २९-१८ ने मात केली तर पुरुष संघाने ‘अ’ गटात बांगलादेशविरुद्ध ३०-१५ ने सरशी साधली.गोल्फ : माने चौथ्या स्थानीभारताच्या उदयन माने याला आशियाई खेळामध्ये गोल्फ स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागल्यामुळे त्याचे पदक पटकाविण्याचे स्वप्न भंगले. मानेने दुसऱ्या फेरीत ६६चे कार्ड खेळताना पदकाच्या शर्यतीत उडी मारली. मात्र, आज ३ अंडर ६९ चे कार्ड खेळताना त्याला ११ अंडर २७७ च्या कार्डसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.