शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

WWE : ... अन् रिंगमध्ये तिला खुर्चीने बदडले, पाहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 21:08 IST

WWEच्या एका लाईव्ह लढतीमध्ये एक भयंकर प्रकार पाहायला मिळाला.

नवी दिल्ली : WWEच्या एका लाईव्ह लढतीमध्ये एक भयंकर प्रकार पाहायला मिळाला. या लढतीदरम्यान एका रेसलरने दुसऱ्या खेळाडूला थेट खुर्चीने बदडल्याचे पाहायला मिळाले. शार्लेट प्लेयर आणि बॅकी लिंच यांच्यामध्ये हा सामना झाला होता. या सामन्यात शार्लेटने बॅकीला चांगलेच धारेवर घेतल्याचे पाहायला मिळाले.

या सामन्याची उत्सुकता चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून होती. कारण या दोघींमध्ये नेहमीच चुरशीची लढत होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे यावेळी नेमकी कोण जिंकणार, याची उत्सुकता साऱ्यांना होती.

हा पाहा खास व्हिडीओ

 

'कॅप्टन कूल' धोनी WWE च्या रिंगमध्ये उतरणार

WWE रॉयल रम्बल हा WWE मधील वर्षातील सर्वात मोठा दुसरा इव्हेंट... पुढील रविवारी होणाऱ्या या लढतीत मोठमोठे सुपरस्टार जेतेपदासाठी भिडतील. विशेष म्हणजे पुरुषांप्रमाणे महिलांतही या प्रतिष्ठेच्या किताबासाठी चुरस रंगणार आहे. गेली अनेक वर्ष हा इव्हेंट WWE च्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. मात्र यंदाचा Royal Rumble सामना थोडा वेगळा आणि भारतीयांसाठी खास असणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ' कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी Royal Rumbleच्या रिंगमध्ये  दिसण्याची शक्यता आहे. 

WWE ने भारतीय चाहत्यांकडून एक पोल मागवला आहे. त्यात त्यांनी धोनीला Royal Rumble सामन्यात पाहायला तुम्हाला आवडेल का, असा सवाल केला आहे. चाहत्यांनीही या पोलला प्रतिसाद देताना WWE आयोजकांना होकार कळवला आहे. 

याआधी WWE चॅम्पियन ब्रॉक लेसनरचा मॅनेजर पॉल हेयमॅनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ट्विटवर प्रतिक्रिया नोंदवली. ऑस्ट्रेलियातील वन डे मालिकेतील भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या कॅप्टन कूल धोनीचे कौतुक करणारे ते ट्विटर होते. त्यावर हेयमॅनने प्रतिक्रिया नोंदवली. त्याची दखल घेत आयसीसीने हेयमॅन आणि लेसनर यांना चक्क वर्ल्ड कप तिकीट ऑफर केले होते. दरम्यान धोनी या Royal Rumble सामन्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे.

त्यावर हेयमॅन म्हणाला," WWE युनिव्हर्सल चॅम्पियनला वर्ल्ड कप स्पर्धेचा जागतिक स्तरावर प्रचार वाढवण्याच्या तुमच्या प्रयत्नांना दाद देतो. तेथे येण्यासाठी तुम्ही आम्हाला आठ अंकी रक्कम द्याल अशी अपेक्षा."

टॅग्स :WWEडब्लू डब्लू ई