शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कुस्तीपटू बजरंग, विनेश यांची खेल रत्न, तर महाराष्ट्राच्या राहुल आवारेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 12:56 IST

अर्जुन पुरस्कारासाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या बजरंग पुनिया आणि कांस्यपदक विजेत्या विनेश फोगाट यांची भारतीय कुस्ती महासंघाने खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. गतवर्षीही बजरंगची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती, परंतु भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला हा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय अर्जुन पुरस्कारासाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. राहुलसह हरप्रीत सिंग, दिव्या काकरान आणि पूजा धांडा यांचेही नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे.  विरेंद्र कुमार, सुजीत मान, नरेंद्र कुमार आणि विक्रम कुमार यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.  ध्यानचंद पुरस्कारासाठी भीम सिंग आणि जय प्रकाश यांचे नाव पाठवण्यात आले आहे. बजरंगने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 2013 मध्ये 60 किलो वजनी गटात कांस्यपदक, तर 2018 मध्ये 65 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. आशियाई स्पर्धेत त्याने 2018 मध्ये सुवर्ण, तर 2014 मध्ये रौप्यपदक जिंकले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याच्या नावावर सुवर्ण ( 2018) आणि रौप्य ( 2014) पदक आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने दोन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं पटकावली आहेत.

गोल्ड कोस्ट येथे गतवर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या विनेशचीही गतवर्षी या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. विनेशने 2014मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत 48 किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. आशियाई स्पर्धेत तिने 2014 मध्ये कांस्य, तर 2018 मध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याशिवाय आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या नावावर तीन कांस्य व तीन रौप्यपदकं आहेत.

2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या राहुल आवारेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्यपदक जिंकले आहेत, तर राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत त्याच्या नावावर सुवर्णपदक आहे. 

टॅग्स :Rahul Awareराहुल आवारेWrestlingकुस्ती