शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

चावा घेणारा मल्ल माझा चांगला मित्र - रवी दहिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 09:50 IST

उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या मल्लाने रवीची भक्कम पकड सोडविण्यासाठी त्याच्या दंडाला कडाडून चावा घेतला. मात्र, रवीने याची तमा न बाळगता वेदना सहन केल्या, पण आपली पकड ढिली पडू दिली नाही आणि अंतिम फेरीत धडक मारली.

- मनोज जोशीकुस्तीसारख्या आक्रमक खेळातील खेळाडू साधारणपणे काहीसे आक्रमक स्वभावाचे असतात. ते आपल्या पराभवाचा किंवा आपल्याविरुद्ध गैरवर्तन करणाऱ्याचा वचपा काढण्यास खूप उत्सुक असतात. पण ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता मल्ल रवी कुमार दहिया हा मात्र याच्या विपरीत आहे. उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या मल्लाने रवीची भक्कम पकड सोडविण्यासाठी त्याच्या दंडाला कडाडून चावा घेतला. मात्र, रवीने याची तमा न बाळगता वेदना सहन केल्या, पण आपली पकड ढिली पडू दिली नाही आणि अंतिम फेरीत धडक मारली. याबाबतीत विचारले असता, रवीने केवळ इतकेच सांगितले की, ‘तो माझा चांगला मित्र आहे. तोही माझ्याप्रमाणेच पदक जिंकण्यास आला होता. खूप मोठ्या स्पर्धेत अशी घटना होत असते आणि मला याचे कोणतेही दु:ख नाही.’रवीने २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत रौप्य जिंकले असून दोन वर्षांपूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य जिंकून त्याने ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती. याशिवाय सलग दोन वेळा त्याने आशियाई अजिंक्यपदमध्ये सुवर्ण जिंकले. त्याने कोलंबिया आणि बल्गेरियाच्या मल्लांना तांत्रिक गुणांच्या आधारे नमवले. यावर त्याने म्हटले की, ‘माझी तयारी पूर्ण झालेली होती. सुरुवातीलाच गुण मिळवल्यानंतर पुढची लढत सोपी होणार याची जाणीव होती. कझाखिस्तानच्या मल्लाविरुद्ध एकवेळ मी पिछाडीवर पडलेलो, पण नंतर माझे डाव अचूक बसले आणि मी विजयी झालो.’ज्या रशियन मल्लाविरुद्ध अंतिम फेरीत रवीचा पराभव झाला होता, त्यानेच रवीला जागतिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही नमवले होते. याचे दडपण होते का, असे विचारले असता रवी म्हणाला, ‘नाही, तोही एक खेळाडू आहे आणि तोही जिंकण्याच्या उद्देशानेच आला होता. त्याचा सराव चांगला होता. शिवाय २०१५ साली झालेल्या दुखापतीचा माझ्या कामगिरीवर परिणामही झाला.’ पण यानंतरही रवी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावण्यापासून मुकला नाही, हे विशेष.आता पुढील वर्षी आशियाई स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पटकावण्याचे लक्ष्य ठेवलेल्या रवीने पीडब्ल्यूएलमधून (कुस्ती लीग) मिळालेला अनुभव महत्त्वाचा ठरल्याचेही सांगितले. ‘लीगमध्ये लढती खेळण्याच्या मिळालेल्या जास्तीत जास्त संधीमुळे स्वत:ची क्षमता पाहता आली. या लीगमुळे आम्हाला आमची तयारी तपासता आली, तसेच आमच्या कमजोरीही कळाल्या. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात कुटुंबीयांची साथ मोलाची ठरली. छत्रसाल स्टेडियममध्ये माझा भाऊ माझी तयारी पाहण्यास येत असे. त्याचे एकच स्वप्न होते की, मी देशासाठी पदक जिंकावे आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यात यश आले, याचा मला खूप आनंद आहे.’ छत्रासालचे योगदानरवीने आपल्या कारकिर्दीत छत्रसाल स्टेडियमचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, ‘जेव्हा सुशीलने ऑलिम्पिक मेडल जिंकले, तेव्हा आम्ही खूप लहान होतो. त्यानंतरच्या ऑलिम्पिकमध्ये सुशील आणि योगेश्वर यांनी पदक आणले तेव्हा ते आम्हाला खूप प्रेरीत करणारे ठरले. आम्ही येथे रोज पहाटे साडेचारला उठतो. पाच वजता क्लास झाल्यानंतर ८ ते ९ सराव व्हायचा. दुपारी थोडावेळ आराम केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा सराव सुरू व्हायचा आणि हा सराव ७ किंवा ८ वाजता संपायचा. प्रशिक्षकांनी नेमून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आमची दिनचर्या ठरायची.’

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021