शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

नीरजकडून विश्व विक्रमाची नोंद

By admin | Updated: July 24, 2016 20:50 IST

अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनिअर गटात विश्वविक्रमाची नोंद करून सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय ठरला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 24 - भारताचा ज्युनिअर स्टार अ‍ॅथलिट नीरज चोप्राने मुलांच्या भालाफेक प्रकारात ८६.४८ मीटर भाला फेकून आयएएएफ जागतिक २० वर्षांखालील अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनिअर गटात विश्वविक्रमाची नोंद करून सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. नीरजने लॅटव्हियाच्या जिगिस्मंड सिरमायसचा ८४.६९ मीटरचा विक्रम मोडीत काढला. जागतिक विक्रमासह त्याने वरिष्ठ गटात राष्ट्रीय विक्रमाचीसुद्धा नोंद केली. चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमध्ये शिकत असलेल्या नीरज ज्युनिअर व सीनिअर गटात विश्वविक्रम नोंदविणारा पहिला भारतीय अ‍ॅथलिट ठरला आहे. नीरजने त्याच्या पहिल्या संधीत ७९.६६ मीटर भाला फेकला. त्यानंतर हरियानाच्या या खेळाडूने आपल्या दुसऱ्या संधीत ८६.४८ मीटर भाला उंच हवेत फेकून विश्वविक्रमाची नोंद केली. नीरजने या फेकीत सीनिअर गटात राजिंदर सिंह यांचा ८२.२३ मीटरचा राष्ट्रीय विक्रमसुद्धा मोडीत काढला. त्याने याचबरोबर स्वत:चा पूर्वीचा ८२.२३ मीटरचा उच्चांकसुद्धा मोडला. रिओ आॅलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय महिला संघात असणाऱ्या सीमा पुनियाने २००० मध्ये २० वर्षांखालील गटात थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते, परंतु उत्तेजक द्रव्यसेवनामध्ये ती अडकल्यामुळे तिचे पदक काढून घेण्यात आले होते. त्यानंतर तिने २००२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते. नयजीत कौर ढिल्लोनेसुद्धा २००४ मध्ये कांस्यपदक आपल्या नावावर केले होते. महिला लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये सीनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. या स्पर्धेसाठी मी कसून सराव केला होता. पहिल्या फेरीनंतर माझा आत्मविश्वास वाढला होता. दुसऱ्या संधीत जेव्हा माझ्या हातातून भाला सुटला तेव्हा माझ्या मनात एक वेगळी भावना निर्माण झाली, की ही फेक विशेष होणार आणि तसेच झाले. जागतिक विक्रमाची नोंद केल्याचे जाहीर आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी यासाठी खूप मेहनत घेतली होती. जास्तकरून माझ्या फिटनेस आणि फेकीच्या तंत्रावर जास्त लक्ष्य केंद्रित केले होते. माझ्या मेहनतीचे फळ मला मिळाले. = नीरज चोप्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विशेष अभिनंदन नीरज चोप्राने ज्युनिअर गटात विश्वविक्रम नोंदविल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे ह्यटिष्ट्वटरह्णवर विशेष अभिनंदन केले. त्याची ही कामगिरी असामान्य आहे. कारण, लंडन आॅलिम्पिक स्पर्धेत या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक विजेत्याने ८४.५८ मीटर भाला फेकला होता. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी नीरजचे अभिनंदन करताना त्याला १० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. सूचना व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोर यांनीसुद्धा ह्यटिष्ट्वटरह्णवर नीरज चोप्राचे अभिनंदन केले. विश्वविक्रमासमोर तुझे व भारताचे नाव पाहणे अभिमानस्पद आहे. तुझे मनापासून अभिनंदन.