शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा : भारताच्या महिला संघाला सांघिक जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 10:37 IST

पहिल्या जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला संघाने सांघिक विजेतेपदाचा मान पटकावला.

मुंबई : पहिल्या जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला संघाने सांघिक विजेतेपदाच्या प्रथम क्रमांकावर २४४.७३ गुण मिळवून आपले नाव नोंदवले आहे.  ४४.४५ गुण मिळवून सिंगापूरने आणि ३०.२२ गुण मिळवून मलेशियाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये जवळपास १५० हुन अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या संपूर्ण स्पर्धा बघण्यासाठी  भारतभरातील विविध राज्यांमधून आजी-माजी मल्लखांब पटूंनी हजेरी लावली होती. विश्व मल्लखांब फेडरेशनच्या विद्यमाने आणि भारतीय मल्लखांब महासंघ तसेच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना यांच्या वतीने संपन्न झालेल्या  मुंबई मधील श्री. समर्थ व्यायाम मंदिर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये जगभरातून इराण, मलेशिया, सिंगापूर, व्हिऐतनाम, जपान, इंग्लंड, भारत, नॉर्वे, बहारीन, फ्रान्स, इटली, स्पेन, झेक रिपब्लिक, अमेरिका, जर्मनी  अशा १५ देशांनी सहभाग घेतला आहे. विविध देशातून आलेल्या स्पर्धकांचे दोरी आणि पुरलेल्या मल्लखांबावरचे सादरीकरण बघण्यासाठी साधारण तीन-चार हजार प्रेक्षक उपस्थित होते. सांघिक विजेतेपदाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक संघामध्ये सहा खेळाडू असणे आवश्यक होते. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी प्रत्येक खेळाडूला दोरी आणि पुरलेला मल्लखांब अशा दोन साधनांवर दोन लहान आणि दोन मोठे असे चार संच करणे अनिवार्य होते.  महिला आणि पुरुष वयोगटातून निवडल्या गेलेल्या सर्वोत्तम सर्वोत्तम दहा खेळाडूंमध्ये वैयक्तिक अजिंक्यपदासाठी स्पर्धा क्रमांक दोनमध्ये सुरस रंगली. तर स्पर्धा क्रमांक तीनचे विजेतेपद साधनांवर केल्या जाणाऱ्या लहान आणि मोठ्या संचांमधील सर्वोत्तम कामगिरी साठी देण्यात आले.

महाराष्ट्राची संस्कृती जपणारा मल्लखांब महाराष्ट्रातील अनेक जिल्यांमध्ये मोठ्या कुशलतेने खेळला जातो. या स्पर्धेच्या निमित्ताने साताऱ्यामधील कारी मल्लखांब संघ, विले-पार्ले मधील पार्लेश्वर व्यायामशाळा यांनी मल्लखांबाचे सादरीकरण केले. ओरिसा मधून आलेल्या श्रीलताने केलेल्या पुरलेल्या मल्लखांबावरच्या सादरीकरणाने  भारतामध्ये विस्तरलेल्या मल्लखांबाचे प्राबल्य दिसून आले. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने महिला विभागात द्वितीय आलेल्या इटलीच्या डेलिया सेरुटीने दोरी मल्लखांबावर तर जपानच्या कोइको टाकेमोटोने पुरलेल्या मल्लखांबावर आपले संच सादर केले. पुरुष विभागातून दीपक शिंदे आणि सागर ओहळकर यांनी दोरी आणि पुरलेल्या मल्लखांबावर आपले कौशल्य सादर केले. नुकतंच जीवन गौरव पुरस्कराने सन्मानित केलेल्या श्री. उद्य देशपांडे यांच्या जर्मनी मधील मल्लखांब खेळाडूंनी संगीताच्या चालीवर आपले मनोरे सादर केले. श्री समर्थ व्यायाम मंदिरात प्रशिक्षण घेणाऱ्या दोन योगासन पट्टुनी योगासनाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक केले.

मल्लखांबामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कर मिळवलेल्या आदित्य अहिरे ( सातारा), यशवंत साटम( मुंबई उपनगर), राजेश राव( मुंबई उपनगर), रवींद्र पेठे(पुणे), महेंद्र चेंबूरकर(मुंबई उपनगर), शांताराम जोशी(रत्नागिरी), नंदा शिंदे(मुंबई शहर ), चित्रा खवळे( मुंबई शहर), पंकज शिंदे( पुणे), सत्यजित शिंदे ( पुणे), विक्रांत दाभाडे ( सातारा) , कल्पेश जाधव( मुंबई उपनगर), प्रदीप चेंबूरकर( मुंबई उपनगर ) या तेरा खेळाडूंकडून स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.  

टॅग्स :Mumbaiमुंबई