शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Neeraj Chopra, World Athletics Championships : स्वप्नपूर्ती! नीरज चोप्राचे जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक पदक, १९ वर्षांचा भारताचा दुष्काळ संपवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 08:26 IST

World Athletics Championships 2022 : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकले.

Neeraj Chopra, World Athletics Championships : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकले. २००३ साली अंजू बॉबी जॉर्ज यांच्यानंतर भारताला जागतिक स्पर्धेक पदक जिंकून देईत तो नीरज चोप्राच, असा आत्मविश्वास सार्थ ठरला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने पहिल्या दोन प्रयत्नात ९० मीटर + भालाफेक करून अन्य स्पर्धकांना सुवर्णपदकापासून झटक्यात दूर केले. पहिल्या तीन फेऱ्यांमधील कामगिरीनंतर नीरज चौथ्या क्रमांकावर होता, परंतु त्याने पुनरागमन केले. चौथ्या प्रयत्नात नीरज थेट रौप्यपदकाच्या शर्यतीत आला अन् त्यानंतर तो मागे हटला नाही.

पात्रता फेरीत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर लांब भालाफेकला अन् अंतिम फेरीतील प्रवेश पक्का केला होता.  नीरजसमोर अंतिम फेरीत आव्हान होते ते ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सचे.. त्याने पात्रता फेरीत ८९.९१ मीटर लांब भालाफेक केला होता आणि तो माजी वर्ल्ड चॅम्पियन आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता झेक प्रजासत्ताकचा जाकुब व्हॅदलेच व जर्मनीचा ज्युलियन वेबर हेही कडवे स्पर्धक होतेच. नीरजचा पहिला प्रयत्न फाऊल ठरला, तेच रोहित यादवने ७७.९६ मीटर भालाफेक केला. पण, अँडरसनने पहिल्याच प्रयत्नात ९०.२१ मीटर लांब भालाफेक करून नीरजसमोर तगडे आव्हान ठेवले. त्यापाठोपाठ वेबरने ८६.८६ मीटर व जाकुबने ८५.५२ मीटर लांब भालाफेक केली.

नीरजचा दुसरा प्रयत्न हा ८२.३९ मीटर इतका राहिला. जाकुबने दुसऱ्या प्रयत्नात कामगिरी सुधारताना ८७.२३ मीटर लांब भालाफेकला.. अँडरसनने पुन्हा ९०.४६ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदकावरील पकड घट्ट केली. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात ८६.३७ मीटर लांब भालाफेक करून पदक शर्यतीत स्वतःला कायम राखण्याचा प्रयत्न केला. जाकुबने सुधारणा करताना ८८.०९ लांब भालाफेक करून रौप्यपदकावर दावा सांगितला. रोहितने तिसऱ्या प्रयत्नात ७८.७२ मीटर अशी कामगिरी सुधारली, परंतु तो टॉप ८मधून बाहेर फेकला गेला. त्याला १०व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

अखेरच्या तीन प्रयत्नांत नीरजला उलटफेर करण्याची संधी होती आणि त्याने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर लांब भालाफेक करून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. रौप्यपदकावर दावा सांगणाऱ्या जाकुबने ८३.४८ मीटर भालाफेक केली. नीरजचा पाचवा प्रयत्न फाऊल ठरला. नीरजने ऐतिहासिक रौप्यपदक नावावर केले. 

आजच्या दिवसाचे काही ठळक निकाल- पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत भारतीयांनी आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी नोंदवली. त्यांना उपांत्य फेरीत ३ मिनिटे ०७.२९ सेकंदाच्या वेळेसह अंतिम स्थानावर समाधान मानावे लागले. मुहम्मद अनास ( ४६.१५ सेकंद), मुहम्मद अजमल ( ४६.४१ से.), एन पंडी ( ४६.४३ से.) आणि राजेश रमेश ( ४८.३० से.) यांनी निराश केले.  

- पुरुषांच्या तिहेरी उडीत प्रथमच अंतिम फेरीत स्थान पटकाणाऱ्या भारतीयाचा मान एल्डोस पॉल ( Eldhose PAUL) ने पटकावला. अंतिम फेरीत पोर्तुगालच्या पेड्रो पिचार्डोने पहिल्याच प्रयत्नात १७.९५ मीटर लांब उडी मारून अन्य स्पर्धकांना सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले.

- तिहेरी उडीत भाताच्या पॉलने १६.३७ मीटर, १६.७९ मीटर, १३.८६ मीटर अशी कामगिरी केली आणि त्यामुळे तो अंतिम ८मधून बाहेर पडला. पॉलला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

India at World Athletics Championships:  ऑलिम्पिकनंतर ८ महिन्यांच्या विश्रांतीनंतर नीरज मैदानावर उतरला तेव्हापासून त्याने तीन स्पर्धांमध्ये स्वतःच्याच नाववर असलेला राष्ट्रीय विक्रम दोन वेळा मोडला. त्याच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होताना दिसली आणि त्याने जागतिक स्पर्धेत ९० मीटरचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. ऑलिम्पिकमध्ये त्याने ८७.५८ मीटर या कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले होते आणि त्यानंतर त्याच्या कामगिरीचा आलेख हा चढाच राहिला आहे.  १४ जूनला फिनलँड येथील तुर्कू येथे झालेल्या Paavo Nurmi  स्पर्धेत त्यानं ८९.३० मीटर लांब भालाफेक करून रौप्यपदक जिंकले होते. चार दिवसांनी फिनलँडच्या कौर्टने येथील स्पर्धेत त्याने ८६.६९ मीटरसह सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर ३० जूनला स्वीडन येथे पार पडलेल्या डायमंड लीग स्पर्धेत ८९.९४ मीटर लांब भाला फेकून राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदक नावावर केले होते. 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राTeam Indiaभारतीय क्रिकेट संघOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021