शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

  सोन्यावर निशाणा! ओजस देवतळेने जिंकले ऐतिहासिक 'सुवर्ण', ठरला पहिला भारतीय पुरुष तिरंदाज  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 20:47 IST

First Indian Male Archer to Win Gold Medal : जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी चमकदार कामगिरी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

World Archery Championships : जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी चमकदार कामगिरी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. महिलांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर ओजस देवतळेने देखील सोनेरी कामगिरी करत सुवर्ण पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे ओजस देवतळे हा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे. अंतिम फेरीत त्याने १५० गुण मिळवून सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केला. 

सध्या बर्लिन येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी अप्रतिम कामगिरी करत तिरंग्याची शान वाढवली. शुक्रवारी भारताच्या महिला खेळाडूंनी सांघिक अंतिम फेरीत देशासाठी पहिले सुवर्ण जिंकले. तर, शनिवारी अदिती स्वामीने वैयक्तिक सुवर्ण जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. लक्षणीय बाब म्हणजे १७ वर्षांची अदिती गोपीचंद स्वामी ही भारताची पहिली विश्वविजेती ठरली आहे. तिने महिलांच्या या स्पर्धेत सुवर्ण पटकावून तिरंग्याची शान वाढवली. खरं तर काल ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला होता. आज देखील अदितीने सोनेरी कामगिरी करत वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले. तिने शनिवारी जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला १४९-१४७ ने पराभूत करून कंपाऊंड तिरंदाजीमध्ये विश्वविजेतेपद मिळवले. 

दरम्यान, अदिती ही भारतातील तिरंदाजीमधील पहिली वैयक्तिक जागतिक चॅम्पियन आहे. या कम्पाऊंडमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. या घवघवीत यशानंतर बोलताना अदितीने म्हटले, "माझ्या आतापर्यंतच्या सर्व प्रयत्नांना आज फळ मिळाले आहे. मी व्यासपीठावर ५२ सेकंदांचे राष्ट्रगीत वाजण्याची वाट पाहत होते... ही फक्त सुरुवात आहे, मला भारतासाठी पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे आहे". ऐतिहासिक विजयानंतर अदिती भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. 

टॅग्स :IndiaभारतGold medalसुवर्ण पदक