शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आॅसी ‘अ’ने मालिका जिंकली

By admin | Updated: August 2, 2015 01:47 IST

आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने दुसऱ्या अनधिकृत चार दिवसीय कसोटीत वर्चस्व कायम राखून भारत ‘अ’चा शनिवारी १० गड्यांनी पराभव केला आणि दोन सामन्यांची मालिका १-० ने जिंकली.

 चेन्नई : आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने दुसऱ्या अनधिकृत चार दिवसीय कसोटीत वर्चस्व कायम राखून भारत ‘अ’चा शनिवारी १० गड्यांनी पराभव केला आणि दोन सामन्यांची मालिका १-० ने जिंकली.अखेरच्या दिवशी ६ बाद २६७ वरून पुढे खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दुसऱ्या डावात २७४ पर्यंत मजल गाठली. आॅस्ट्रेलियाकडून गुरिंदर संधूने ७६ धावांत ४ गडी बाद करताच पहिल्या अर्ध्या तासात भारताचे तळाचे फलंदाज बाद झाले. संधूने श्रेयस गोपालला शून्यावर, वरुण अ‍ॅरोन १ आणि बाबा अपराजितला ३० धावांवर तंबूची वाट दाखविली. डावखुरा फिरकी गोलंदाज स्टीव्ह ओकिफेने ८८ धावांत ४ गडी बाद केले. शार्दूल ठाकूर बाद होताच भारताचा डाव संपला. विजयासाठी ६१ धावांचे लक्ष्य होते. सलामीचा कॅमेरुन बेनक्राफ्टने नाबाद २१ आणि कर्णधार उस्मान ख्वाजाने नाबाद ४१ धावा करीत आॅस्ट्रेलियाचा विजय साजरा केला. सामन्यात संधूने सात, ओकिफेने सहा गडी बाद केले. पहिल्या डावात १५० धावा ठोकणारा बेनक्राफ्ट विजयाचा शिल्पकार ठरला. भारताने पहिल्या डावात केवळ १३५ धावा केल्या तर आॅस्ट्रेलियाने २४९ धावा करीत ११४ धावांची आघाडी मिळविली होती. भारत अ कडून बाबा अपराजितने ५ गडी बाद केले. विराट कोहलीने लंका दौऱ्याची तयारी म्हणून या सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने १६ आणि ४५ धावा केल्या. उभय संघांत झालेला पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. (वृत्तसंस्था)पहिला डाव - भारत अ सर्वबाद १३५ - मुकुंद १५, कोहली १६, नायर ५०.गोलंदाजी - संधु ३/२५, फेकटे २/३३, ओ, किफ २/३०, एगर २ /३३); दुसरा डाव - भारत अ - २७४; अभिनव मुकूंद ५९, विराट कोहली ४५, के. नायर ३१, श्रेयस अय्यर ४९; गोलंदाजी - संधू ४/७९, ओ, कीफ ४ / ८८, एगर १/७१; आॅस्ट्रेलिया अ पहिला डाव : सर्वबाद ३४९; बॅनक्रॉफ्ट १५०, उस्मान ख्वाजा ३३, फर्गसन ५४, संधु ३६; प्रग्यान ओझा ३/१०७, बाबा अपराजीत ५ /८६ गोपाल १/६९; आॅस्ट्रेलिया अ दुसरा डाव - बिनबाद ६२; बॅनक्राफ्ट नाबाद २१, उस्मान ख्वाजा नाबाद ४१.