शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Tokyo Olympic: ऑलिम्पिक पदक जिंकले, आता करा ५ वर्षे मोफत विमान प्रवास; दोन कंपन्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 16:48 IST

Free air Travel from Airlines: भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदके आहेत. या सर्वांना 2025 पर्यंत गो एअरमधून मोफत विमान प्रवास करता येणार आहे.

नवी दिल्ली: यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदके मिळविणाऱ्या खेळाडूंवर बक्षीसांची लयलूट करण्यात आली आहे. सर्वाधिक बक्षीसे ही नीरज चोप्राला मिळाली आहेत. असे असले तरीदेखील गो एअरने या पदकविजेत्यांसाठी (Olympics medal winners) अफलातून ऑफर दिली आहे. गो फर्स्ट (Go First) ने या खेळाडूंना पुढील पाच वर्षे देशात, परदेशात त्यांच्या विमानाने मोफत प्रवास करण्याची संधी दिली आहे. (A number of Indian airlines, including Go First to Star Air, have now offered free air travel to all sportspersons from the country who won a medal at the 2020 Tokyo Olympics.)

Neeraj Chopra : गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा झाला करोडपती; ३ तासांत १६.७५ कोटींचे रोख बक्षीस जाहीर, जाणून घ्या संपूर्ण लिस्टभारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदके आहेत. या सर्वांना 2025 पर्यंत गो एअरमधून मोफत विमान प्रवास करता येणार आहे. नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावले आहे. यामुळे त्याच्या राज्याने सहा कोटी रुपये आणि फर्स्ट क्लास नोकरी देऊ केली आहे. तर बीसीसीआयने एक कोटी, पंजाब सरकारने दोन कोटी अशी बक्षीसे दिली आहेत. या आधी अभिनव बिंद्राने बिजिंग ऑलिम्पिकमध्ये शुटिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. 

गो एअरने दिलेल्या ऑफरमध्ये हे सहा खेळाडू आहेत. यामध्ये मीराबाई चानू , पी व्ही सिंधू, लवलीना बोरगोहेन, रवि कुमार दहिया, बजरंग पुनिया, नीरज चोपड़ा यांची नावे आहेत. महत्वाचे म्हणजे हॉकी पुरुषांच्या अख्ख्या संघाला देखील मोफत विमान प्रवास दिला जाणार आहे. स्टार एअरने देखील अशीच घोषणा केली आहे. या सहा जणांसह हॉकी संघाला त्यांच्या विमानांच्या रुटवर मोफत विमान प्रवास जाहीर केला आहे.  

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Neeraj Chopraनीरज चोप्राPV Sindhuपी. व्ही. सिंधूMirabai Chanuमीराबाई चानूHockeyहॉकी