महिलांची विश्वचषक सॉफ्टबॉल स्पर्धा विदर्भाच्या २ खेळाडू भारतीय संघात

By Admin | Updated: July 4, 2016 21:41 IST2016-07-04T21:41:14+5:302016-07-04T21:41:14+5:30

कॅनडामधील सरे शहरात होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्रील ३ खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे.

Women's World Cup Softball Tournament 2 Vidarbha players in Indian squad | महिलांची विश्वचषक सॉफ्टबॉल स्पर्धा विदर्भाच्या २ खेळाडू भारतीय संघात

महिलांची विश्वचषक सॉफ्टबॉल स्पर्धा विदर्भाच्या २ खेळाडू भारतीय संघात

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. ४ : कॅनडामधील सरे शहरात होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्रील ३ खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. यात भोसरी (जि. पुणे) येथील रहिवासी स्मिता गांगुर्डे, अमरावती येथील जुही माकेश्वर आणि नागपूरची पूजा भारती यांचा समावेश आहे.
ही स्पर्धा येत्या १५ तारखेपासून सुरू होत आहे. यासाठी ५ ते ११ तारखेदरम्यान दिल्लीत सराव शिबिर होत आहे. त्यासाठी स्मिता नुकतीच दिल्लीला रवाना झाली. पिंपरी चिंचवड संघटनेची खेळाडू असलेल्या स्मिताने खेळाडूबरोबरच विविध स्तरावरील स्पर्धांमध्ये पंच म्हणूनही काम केले आहे.

Web Title: Women's World Cup Softball Tournament 2 Vidarbha players in Indian squad