शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या महानंदचे अखेर गुजरातच्या एनडीडीबीकडे हस्तांतरण; मदर डेअरीने घेतला ताबा
2
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
3
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
4
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
5
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
6
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
7
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
8
मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!
9
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
10
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
11
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
12
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
13
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
15
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
16
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
17
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
18
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
19
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
20
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...

महिला टी-२० विश्वचषक; भारताचे बांगलादेशसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2016 5:03 PM

भारताने निर्धारीत २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या. बांगलादेशसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. १५  - मिताली राज(४२), वेलास्वामी वनिता(३८), हरमनप्रीत कौर(३९) व वेदा कृष्णस्वामी(३६) यांच्या दमदार खेळाच्या बळावर भारताने निर्धारीत २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या. बांगलादेशसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले आहे. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आंमत्रित केले होते. आजपासून महीला टी २० विश्वचषकास सुरवात झाली असुन सलामीचा सामना भारत आणि बांगलादेश दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे आहे. 
 
कर्णधार मिताली राज आणि वेलास्वामी वनिताने ६२ धावांची धडाकेबाज दिली. या सलामीच्या जोडीने पहिल्या ६.३ षटकात १० च्या धावगतीने ६३ धावांची धडाकेबाज सलामी दिली. कर्णधार मिताली राजने ३५ चेंडून ५ चौकाराच्या मदतीने संयमी ४२ धावांची खेळी केली तर वेलास्वामी वनिताने २४ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने झटपट ३८ धावांची खेळी केली. 
 
भारत मजबूत स्थितीत असतानाच भारताला सलग दोन झटके बसले वेलास्वामी वनितानंतर मंदना खातेही न उघडता बाद झाल्याने भारताची धावगती मंदावली. अनुभवी मिताली राजने कौर सोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. हरमनप्रीत कौरने आक्रमक फंलदाजी करताना २९ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने झटपट ३९ धावा केल्या. शेवटच्या हाणामारीच्या षटकात वेदा कृष्णस्वामीने २४ चेंडूत २ षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या. बांगलादेश तर्फे रुमाना अहमद आणि फाहिमा खातूनने भारताच्या दोन फलंदानां बाद केले. तर नाहिदा अख्तरने एका भारतीय फलंदाजाला तंबूचा रास्ता दाखवला.