शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महिला बॉक्सिंगमध्ये खूप सुधारणा झाली, पण खेळाडूंचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 01:59 IST

‘महिला बॉक्सिंगमध्ये आज खूप सुधारणा झाली आहे, पण खेळाडूंचे काय? त्यांच्या कामगिरीमध्ये कधी सुधारणा होणार,’ असा प्रश्न सहा वेळची जागतिक विजेती बॉक्सर मेरीकोम हिने उपस्थित केला.

मुंबई : ‘महिला बॉक्सिंगमध्ये आज खूप सुधारणा झाली आहे, पण खेळाडूंचे काय? त्यांच्या कामगिरीमध्ये कधी सुधारणा होणार,’ असा प्रश्न सहा वेळची जागतिक विजेती बॉक्सर मेरीकोम हिने उपस्थित केला. इंडियन फेडरेशन आॅफ स्पोर्ट गेमिंगच्या (आयएफएसजी) वतीने भारताच्या विविध युवा खेळाडूंना ‘स्टार्स आॅफ टुमॉरो’ (एसओटू) या उपक्रमांतर्गत मेरीकोमच्या हस्ते गौरविण्यात आले.बुधवारी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मेरीकोमने म्हटले की, ‘आज खेळामध्ये सोईसुविधांच्या बाबतीत मोठी सुधारणा झाली आहे. मात्र, त्या तुलनेत खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही. खेळाडूंसाठी चांगले साहित्य उपलब्ध असून खेळाडूंना मोठा पाठिंबाही मिळत आहे, परंतु तरीही कामगिरीत सुधारणा झालेली पाहण्यास मिळत नाही. खेळाडूंनी खेळताना विचारात्मक खेळ करावा. त्यांनी मानसिकरीत्या अधिक सक्षम होणे गरजेचे आहे, पण या गोष्टी त्यांच्यामध्ये पाहण्यास मिळत नाही. अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा मोठा अनुभव असूनही, त्यांच्या खेळाचा स्तर मात्र म्हणावा तसा उंचावलेला नाही.’मेरीकोम पुढे म्हणाली की, ‘मी जेव्हा जागतिक स्पर्धेत पहिले दोन सुवर्ण पदक जिंकले, तेव्हाही अनेकांना माझ्या बाबतीत किंवा माझ्या कामगिरीची माहिती नव्हती. कोणतीही मदत मिळत नसल्याने मी एकटीच वाटचाल करत होती. बस, रेल्वेने प्रवास होत होता. एखाद्या स्पर्धेदरम्यान राहण्यासाठी साधी खोली मिळायची, पण या सर्व गोष्टी माझ्यासाठी एकप्रकारे चांगल्या ठरल्या. कारण यामुळे मला प्रतिकूल परिस्थितीतून पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. जर मी एखाद्या श्रीमंत घरातील असते, तर मला कदाचित संघर्ष काय असतो, हे कळालेच नसते. त्यामुळे एका साधारण कुटुंबातून पुढे आल्याचा मला अभिमान आहे. यानंतर, तिसऱ्यांदा व चौथ्यांदा जागतिक जेतेपद पटकावल्यानंतर मला पुरस्कर्ते मिळाले.’टोकियो २०२० सालच्या आॅलिम्पिक तयारीविषयी मेरीकोमने सांगितले की, ‘यंदाच्या जागतिक स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात खेळलेल्या खेळाडूंवर मी लक्ष ठेवून होते. यापैकी एक-दोन खेळाडू आव्हानात्मक वाटले, पण इतर खेळाडू सर्वसाधारण असल्याने माझ्याकडे संधी आहे. या सर्व खेळाडूंचा आता व्यवस्थित अभ्यास करून, त्यानुसार मी योजना तयार करेन.’तसेच, ‘तयारी करताना योग्य साथीदार मिळणेही आवश्यक असते, पण त्याची कमतरता आपल्याकडे भासते. इतर वजनी गटातील खेळाडूंकडूनही अपेक्षित मदत होत नाही. त्यांचे केवळ त्यांच्या खेळावर प्रेम आहे. देशाचा विचार त्यांच्याकडून झाला, तरच आपल्याला यश मिळू शकेल,’ असेही मेरी म्हणाली.पोलंड स्पर्धेचा जागतिक स्पर्धेसाठी झाला फायदासहावे जागतिक सुवर्ण पदक मिळविण्यात काहीच अडचण आली नाही. मला माझ्या तयारीवर पूर्ण विश्वास होता. आशियाई स्पर्धेतही मला विशेष स्पर्धा मिळाली नाही. पोलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत मात्र तुलनेत चांगली लढत मिळाली. या स्पर्धेत जागतिक स्पर्धेत सहभाग घेतलेल्या बहुतेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामुळे तयारी चांगली झाली होती.- एम. सी. मेरीकोम.