रोसेयू : आॅस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारपासून प्रारंभ झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एकवेळ दमदार स्थितीत असलेल्या विंडीज संघाने अखेरच्या ९ विकेट ८५ धावांत गमावल्यामुळे त्यांचा डाव १४८ धावांत सुंपष्टात आला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलियाची पहिल्या डावात ३ बाद ८५ अशी स्थिती होती. स्टिव्ह स्मिथ (१७) व अॅडम व्होजेस (२०) खेळपट्टीवर होते.त्याआधी, जोश हेजलवुड व मिशेल जॉन्सन (प्रत्येकी ३ बळी) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने यजमान संघाचा पहिला डाव झटपट गुंडाळला. वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने दोन बळी घेतले. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने स्लिपमध्ये तीन झेल टिपले. एकवेळ विंडीज संघाची १ बाद ६३ अशी दमदार स्थिती होती, पण त्यानंतर पाच विकेट २८ धावांच्या मोबदल्यात माघारी परतल्यामुळे त्यांचा डाव अडचणीत आला. डॅरन ब्राव्होने खाते उघडण्यासाठी १४ चेंडूंची प्रतीक्षा केली, पण आॅफ साईडला फटका मारण्याच्या प्रयत्नात तो स्लिपमध्ये तैनात क्लार्ककडे झेल देत माघारी परतला. वेस्ट इंडीज पहिला डाव :- के. ब्रेथवेट झे. हॅडिन गो. हेजलवुड १०, एस. होप झे. मार्श गो. जॉन्सन ३६, डॅरेन ब्राव्हो झे. क्लार्क गो. लियोन १९, एस. डोरिच त्रि. गो. हेजलवुड १५, एस. सॅम्युअल्स झे. हेजलवुड गो. स्टार्क ०७, जे. ब्लॅकवुड झे. क्लार्क गो. हेजलवुड ०२, दिनेश रामदिन त्रि. गो. जॉन्सन १९, जेसन होल्डर झे. मार्श गो. स्टार्क २१, जे. टेलर झे. व्होजेस गो. स्मिथ ०६, डी. बिशू नाबाद ०९, एस. गॅब्रियल झे. क्लार्क गो. जॉन्सन ०२. अवांतर (२). एकूण ५३.५ षटकांत सर्वबाद १४८. आॅस्ट्रेलिया पहिला डाव :- डेव्हिड वॉर्नर झे. ब्लॅकवुड गो. टेलर ०८, शॉन मार्श झे. ब्राव्हो गो. होल्डर १९, शेन वॉटसन झे. होल्डर गो. बिशू स्टीव्हन स्मिथ, खेळत आहे १७, मायकल क्लार्क झे. रामदिन गो. बिशू १८, ए. व्होजेस खेळत आहे २०. अवांतर (३). एकूण ३० षटकांत ३ बाद ८५.
विंडीज १४८ धावांत गारद
By admin | Updated: June 5, 2015 01:05 IST