शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘शिवछत्रपती पुरस्कारा’चे निकष बदलणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 06:58 IST

फुटबॉल खेळात खेळाडू, संघटक, मार्गदर्शक पात्रता निकषांत बसत नसल्याने अनेक फुटबॉलपटूंना या पुरस्कारापासून वंचित राहावे लागते.

सचिन भोसले कोल्हापूर : राज्य शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये फुटबॉल खेळात खेळाडू, संघटक, मार्गदर्शक पात्रता निकषांत बसत नसल्याने अनेक फुटबॉलपटूंना या पुरस्कारापासून वंचित राहावे लागते. यंदा राज्य सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष, तसेच ‘विफा’चे उपाध्यक्ष आदित्य ठाकरे आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष, तसेच ‘विफा’चे उपाध्यक्ष विश्वजित कदम हे दोघेही असल्याने राज्यातील फुटबॉलपटूंना निकष नियमावलीत बदल होण्याची आशा आहे.फुटबॉलपटूंना संतोष ट्रॉफीसारख्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य अथवा कांस्य अशी पदके सलग चार वर्षे मिळवावी लागतात किंवा फेडरेशन कप, बी. सी. रॉय ट्रॉफी, आंतरराष्ट्रीय वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागते. तरच हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पदरात पडतो. विशेष म्हणजे, भारतीय संघातून प्रतिनिधित्व केले, तरी हा पुरस्कार खेळाडूंना मिळत नाही.फुटबॉल संघटक-कार्यकर्त्यांना या पुरस्कारासाठी देशभरात सातत्याने सराव शिबिरांच्या आयोजनासह आंतरराष्ट्रीय खेळाडू संघांच्या आंतरराष्ट्रीय सहली नेल्या पाहिजेत, तसेच त्यांचे प्रमुख प्रशिक्षकपद भूषविले पाहिजेत, तरच हा पुरस्कार त्यांना मिळेल. प्रशिक्षकांना तर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धाही भरविल्या पाहिजेत, असे निकष आहेत.एकूणच शिवछत्रपती पुरस्कार छाननी समितीचे निकष पाहिल्यास हा प्रतिष्ठेचा पुरस्कार फुटबॉलपटूंसह प्रशिक्षक आणि संघटकांना मिळणे कठीणच झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने निकष बदलले तरच फुटबॉलपटूंना यंदाच्या शिवछत्रपती पुरस्काराचा मान मिळेल. अन्यथा, हा वीस वर्षांहून अधिकचा दुष्काळ तसाच सुरू राहील.>जलतरण, हॉकी, नेमबाजी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, खो-खो, मल्लखांब यांतील खेळाडू व संघटकांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित केले जाते. विशेषत: कुस्ती, नेमबाजी यांना झुकते माप मिळते. मात्र, फुटबॉलसाठी वेगळे निकष लावल्याने सरकारच्या निकषांत बसणारे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक मिळणे कठीण आहे. - विकास पाटील , फुटबॉल संघटक