शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

फ्रेंच ओपनसह अनेक स्पर्धांमध्ये खेळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 2:46 AM

रॉजर फेडरर : गुडघा दुखापतीचा बसला फटका; सोशल मीडियावरुन दिली माहिती

पॅरिस : प्रदीर्घ कालावधीपासून गुडघ्याच्या दुखापतीला सामोरे जात असलेल्या टेनिससम्राट रॉजर फेडरर याने अखेर आपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करवून घेतली. यानंतर गुरुवारी स्वित्झर्लंडच्या या दिग्गज खेळाडूने, ‘आपण आगामी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणार नाही,’ असेही जाहीर केले. केवळ फ्रेंच ओपनच नाही, तर दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी अनेक स्पर्धांमध्ये फेडरर सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. २० ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलेल्या फेडररने आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे माहिती दिली.बुधवारी स्वित्झर्लंडमध्येच फेडररच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून २४ मे ते ७ जूनदरम्यान रंगणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेसह अनेक स्पर्धांमध्ये त्याचा सहभाग नसेल. त्याने शस्त्रक्रियेची माहिती देताना सांगितले की, ‘यामुळे मी दुबई, इंडियन वेल्स, बोगोटा, मियामी आणि फ्रेंच ओपन स्पर्धा खेळू शकणार नाही.’ त्याचप्रमाणे, ‘शस्त्रक्रिया टाळण्याचा माझा पूर्ण प्रयत्न होता, मात्र खूप प्रयत्न केल्यानंतर गुडघादुखीचा त्रास दूर होत नव्हता,’ असेही फेडररने म्हटले. 

टॅग्स :Tennisटेनिस