शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी कोणाची, दिवाळं कोणाचं ?

By admin | Updated: October 29, 2016 03:29 IST

कामगिरीत सातत्याचा अभाव असलेला भारतीय संघ आज, शनिवारी पाचव्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडविरुद्ध मालिका विजयाच्या निर्धाराने

विशाखापट्टणम् : कामगिरीत सातत्याचा अभाव असलेला भारतीय संघ आज, शनिवारी पाचव्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडविरुद्ध मालिका विजयाच्या निर्धाराने उतरणार आहे. या सामन्यात धोनीच्या नेतृत्वकौशल्याची कसोटी पणाला लागेलच, शिवाय ‘फिनिशर’च्या भूमिकेची परीक्षा ठरेल. मालिकेत २-२ अशी बरोबरी झाली असल्याने शेवटचा सामना जिंकून दिवाळी कोण साजरी करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.न्यूझीलंडला पहिल्यांदा द्विपक्षीय मालिका जिंकून इतिहास घडविण्याची संधी असेल. सामन्यावर वादळ आणि पावसाचे संकट कायम आहे. धोनीच्या नेतृत्वावर सध्यातरी संकट नसले तरी न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावल्यास क्षमतेवर प्रश्नचिन्ह लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताने धोनीच्या नेतृत्वात गेल्या काही महिन्यांत तीन एकदिवसीय मालिका गमावल्या. भारताचा बांगला देशकडून १-२ ने, आॅस्ट्रेलियाकडून १-४ ने आणि द. आफ्रिकेकडून २-३ ने पराभव झाला होता. १८ महिन्यांत केवळ झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकता आली होती.न्यूझीलंडने या मालिकेत धर्मशाळा येथे पहिला सामना गमावल्यानंतर दिल्लीत कर्णधार केन विलियम्सन आणि रांचीत मार्टिन गुप्तिलच्या धडाकेबाज खेळीद्वारे विजय नोंदवीत मालिकेत चुरस निर्माण केली. विराटवर भारतीय संघ या मालिकेत विसंबून असलेला जाणवला. दुसरीकडे रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेच्या सलामी जोडीने आतापर्यंत निराशच केले. रांची येथे रहाणेने अर्धशतक ठोकले, पण विराट बाद होताच मधली फळी कोसळली.गोलंदाजीत अमित मिश्रा, अक्षर पटेल आणि केदार जाधव यांच्या फिरकी त्रिकुटाने चांगली कामगिरी केल्यामुळे अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची उणीव जाणवली नाही. वेगवान गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह हा लवकर फिट व्हावा, असे संघ व्यवस्थापनाला वाटत असावे; कारण रांचीत त्याचे स्थान घेणाऱ्या धवल कुलकर्णी याने चक्क निराश केले होते. न्यूझीलंडला गुप्तिल फॉर्ममध्ये परतल्याचा लाभ झाला. टॉम लेथमसोबत तो चांगली सुरुवात करून देत आहे. तिसऱ्या स्थानावर विलियम्सनने कर्णधाराला साजेशी कामगिरी केली. पाऊस आणि वादळ हे अस्मानी संकट कायम असले तरी भारताने सामना जिंकून दिवाळीची भेट द्यावी, अशी तमाम भारतीयांची इच्छा असेल. न्यूझीलंडदेखील ऐतिहासिक मालिका विजयासह परत जाण्याच्या इराद्यासह उतरणार आहे. (वृत्तसंस्था)लक्षवेधी...1988पासून भारतात झालेल्या चारही द्विपक्षीय मालिकेत न्यूझीलंड संघ पराभूत झाला आहे.हवामानाची साथ लाभल्यास टीम इंडिया वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर विजयाची नोंद करण्यास उत्सुक असेल. या मैदानावर टीम इंडियाने चार सामने जिंकले तर एक सामना गमावला.भारताने नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिका क्लीनस्वीपसह ५-० ने जिंकली होती. धोनी कारकीर्दीत अखेरच्या टप्प्यात मालिका गमावण्याचा धोका पत्करणार नाही, हे तितकेच खरे.विराट कोहलीसाठी हे मैदान लकी मानले जाते. धोनीनेदेखील याच मैदानावर पाकविरुद्ध १२३ चेंडूत १४८ धावा ठोकल्या होत्या. उभय संघभारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, अमित मिश्रा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मनदीपसिंग.न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्तिल, टॉम लेथम, रॉस टेलर, कोरी अ‍ॅन्डरसन ल्यूक रोंची, जिमी नीशाम, मिशेल सेंटनर, टिम साऊदी, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, ईश सोढी, अँटन डेव्हसिच, बीजे वॉटलिंग, डग ब्रेसवेल. सामन्याची वेळ :दुपारी १.३० पासून