शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘अर्जुन पुरस्कार मिळेल यासाठी कुठले पदक जिंकू’; साक्षी मलिकचं थेट पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:37 IST

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य विजेत्या साक्षीने, ‘माझ्या नावामागे अर्जुन पुरस्कार विजेती अशी बिरुदावली लागावी हे माझे स्वप्न आहे. अर्जुन पुरस्कार मिळावा यासाठी असे कुठले पदक जिंकावे,’ हे आपणच सुचवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांवर वाद निर्माण होणे नवीन नाही. यंदाही नव्या वादाला तोंड फुटले. क्रीडा मंत्रालयाने शुक्रवारी ‘खेलरत्न’ पुरस्काराची मानकरी ठरलेल्या महिला मल्ल साक्षी मलिक आणि भारोत्तोलनपटू मीराबाई चानू यांना अर्जुन पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे समितीने सुचविलेल्या २९ पैकी २७ खेळाडूंनाच हा पुरस्कार मिळणार आहे. या निर्णयामुळे हताश झालेल्या साक्षी मलिकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली शिवाय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना प्रश्न विचारला आहे.

साक्षीला २०१७ ला देशातील चौथा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच कारणास्तव यंदा तिला अर्जुन पुरस्कार नाकारण्यात आला. मागच्या आठवड्यात न्या.(सेवानिवृत्त) मुकुंदकम शर्मा यांच्या नेतत्वाखालील निवड समितीने २९ जणांच्या नावांची अर्जुन पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली होती. साक्षी आणि मीराबाई या दोघींना अर्जुन पुरस्कार देण्याचा निर्णय रिजिजू यांच्यावर सोपवण्यात आला होता. समितीने यादीत दोघींच्या नावाचा समावेश केला, तेव्हापासूनच टीका होऊ लागली होती. कोरोनामुळे २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात होणार नाही. विजेत्यांना व्हर्च्युअल पद्धतीने पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य विजेत्या साक्षीने, ‘माझ्या नावामागे अर्जुन पुरस्कार विजेती अशी बिरुदावली लागावी हे माझे स्वप्न आहे. अर्जुन पुरस्कार मिळावा यासाठी असे कुठले पदक जिंकावे,’ हे आपणच सुचवा, असा प्रश्न क्रीडामंत्र्यांना विचारला आहे. तिने पुढे लिहिले, ‘मा. मोदीजी आणि मा. क्रीडामंत्रीजी, मला खेलरत्नने सन्मानित करण्यात आले याचा अभिमान वाटतो. सर्व पुरस्कार आपल्या नावावर असावेत असे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. खेळाडूू यासाठी प्राणाची बाजी लावतो. मला अर्जुन पुरस्कार मिळावा, हे स्वप्न आहे. कुस्ती कारकीर्दीत कधीही अर्जुन पुरस्कार प्राप्त करण्याचे स्वप्न माझ्या वाट्याला येणार नाही काय?’

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी