शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

१६ वर्षांची असताना त्याने ड्रग्स दिले, अत्याचारही केला! दिवंगत फुटबॉलपटूवर ३७ वर्षीय महिलेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 10:22 IST

ही महिला सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. पत्रकारांशी संवाद साधताना मंगळवारी ती म्हणाली, ‘फिडेल कॅस्ट्रोचे शासन आणि मॅरेडोना यांच्यात जवळीक असल्याने जवळपास पाच वर्षे माझ्यावरील अन्यायाला वाचा फुटू शकली नाही.

ब्यूनस आयर्स : फुटबॉल विश्वाचा माजी सम्राट दिवंगत दिएगो मॅरेडोना (Diego Maradona) यांच्यासोबत ‘लिव्ह इन’ राहिलेल्या क्यूबाची ३७ वर्षांची माविस अल्वारेज (Mavis Alvarez) हिने त्यांच्यावर ड्रग्ज सेवनाची सवय लावणे, तसेच शारीरिक शोषण आणि अत्याचार केल्याचा आरोप केला. अर्जेंटिनाच्या न्यायालयात साक्ष नोंदविण्यासाठी दाखल झालेल्या या महिलेने मी १६ वर्षांची असताना लैंगिक शोषण सुरू झाल्याचे म्हटले आहे.ही महिला सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. पत्रकारांशी संवाद साधताना मंगळवारी ती म्हणाली, ‘फिडेल कॅस्ट्रोचे शासन आणि मॅरेडोना यांच्यात जवळीक असल्याने जवळपास पाच वर्षे माझ्यावरील अन्यायाला वाचा फुटू शकली नाही. फुटबॉलमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या मॅरेडोनाने ड्रग्जचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले. मृत्यूच्या दाढेत असताना कॅस्ट्रो यांच्या निमंत्रणावरून कोकेनपासून सुटका करण्याच्या उपचारासाठी अनेक वर्षे क्यूबामध्ये वास्तव्य केले.’

अल्वारेज मागच्या आठवड्यापासून ब्यूनस आयर्समध्ये आहे. मॅरेडोनाचा मागच्या नोव्हेंबरमध्ये मृत्यू झाला. तथापि,  महिलांवरील अत्याचाराविरुद्ध लढणारे काही वकील मॅरेडोनाच्या सहकाऱ्यांना टार्गेट करीत आहेत. 

अल्वारेज म्हणाली, ‘मी १६ वर्षांची तर मॅरेडोना ४० वर्षांचा होता. तो क्यूबामध्ये रहायचा. अमली द्रव्य सेवनाची सवय सोडणारे उपचार घेत असताना त्याने माझ्यावर बलात्कार केला. ‘त्याने माझे बालपण’ हिरावून घेतले! आमचे संबंध चार- पाच वर्षे चालले. या काळात त्याने अमानुष मारहाण आणि अत्याचारही केले. मी त्याच्यावर प्रेम करायची आणि त्याचा तिरस्कारदेखील! अनेकदा आत्महत्येचा विचार मनात आला. इतकी वर्षे मौन पाळल्यानंतर मी का बोलते आहे, असे अनेकांना वाटत असावे. पण मॅरेडोनाच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत असताना टीव्हीवर ज्या मालिका दाखविल्या जात आहेत, त्यात हे प्रकरण असावे असे मला मनापासून वाटले.’ 

टॅग्स :FootballफुटबॉलArgentinaअर्जेंटिना