शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
3
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
4
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
5
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
6
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
7
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
8
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
9
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
10
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
11
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
12
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
13
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

द. आफ्रिकेची आज विंडीजशी ‘टक्कर’

By admin | Updated: February 27, 2015 00:34 IST

आक्रमक फलंदाजीचा ‘बादशाह’ ख्रिस गेल याला सूर गवसल्यानंतर आत्मविश्वासाचा संचार झालेल्या वेस्ट इंडीजशी आज, शुक्रवारी विश्वचषकाच्या ‘ब’ गटात दोन हात करताना द

सिडनी : आक्रमक फलंदाजीचा ‘बादशाह’ ख्रिस गेल याला सूर गवसल्यानंतर आत्मविश्वासाचा संचार झालेल्या वेस्ट इंडीजशी आज, शुक्रवारी विश्वचषकाच्या ‘ब’ गटात दोन हात करताना द. आफ्रिकेची पुरती दमछाक होऊ शकते. वेगाचा सम्राट डेल स्टेन विरुद्ध फटकेबाजी करण्यात तरबेज मानला जाणारा गेल यांच्यात चांगलीच जुगलबंदी होण्याची शक्यता आहे.मागच्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेला १३० धावांनी नमविले. यामुळे दोन गुण घेणारा आफ्रिकेचा संघ ब गटात भारत, विंडीज आणि आयर्लंडच्या तुलनेत माघारला आहे. आफ्रिकेने मागच्या महिन्यात मायदेशात विंडीजचा ४-१ ने धुव्वा उडविला होता; पण झिम्बाब्वेर ७३ धावांनी मिळालेल्या विजयानंतर कॅरेबियन संघ उत्साहित आहे. ख्रिस गेलने या सामन्यात विक्रमी १६ षट्कारांसह २१५ धावा ठोकल्या होत्या. मर्लोन सॅम्युअल्सनेदेखील १३३ धावांची खेळी करीत दोघांनी वन-डे क्रिकेटमधील ३७२ धावांच्या भागीदारीचा विक्रम केला. द. आफ्रिकेने विंडीजला पराभूत न केल्यास त्यांना उपांत्यपूर्व फेरीत धडक देण्यासाठी पुढील लढतीत आयर्लंड, पाक आणि यूएईवर विजय नोंदविणे क्रमप्राप्त ठरेल. विश्वचषकात आफ्रिकेने पाचपैकी तीन सामन्यांत विंडीजला नमविले आहे. १९९२, १९९९ आणि २००७ च्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणाऱ्या आफ्रिका संघाला आज दबावातही आम्ही चांगले खेळू शकतो हे सिद्ध करावे लागेल.कर्णधार डिव्हिलियर्स म्हणाला, ‘हा आमच्यासाठी मोठा सामना असून, कुठल्याही स्थितीत जिंकायचा आहे. आम्ही ताजेतवाने होऊन आलोत. माझा संघ मुसंडी मारेल, याबद्दल आश्वस्त आहे.’ (वृत्तसंस्था)