वेस्ट इंडिजचा श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय.

By admin | Published: March 20, 2016 10:38 PM2016-03-20T22:38:57+5:302016-03-20T22:41:03+5:30

इंग्लंडवर धडाकेबाज विजयासह आत्मविश्वास दुणावलेला वेस्ट इंडिज संघाने आज (रविवारी) टी-२० विश्वचषकात दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा ७ गडी आणि १० चेंडू राखून पराभव केला.

West Indies beat Sri Lanka by 7 wickets | वेस्ट इंडिजचा श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय.

वेस्ट इंडिजचा श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय.

Next

 ऑनलाइन लोकमत

बेंगळुरू, दि. २० - इंग्लंडवर धडाकेबाज विजयासह आत्मविश्वास दुणावलेला वेस्ट इंडिज संघाने आज (रविवारी) टी-२० विश्वचषकात दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा ७ गडी आणि १० चेंडू राखून पराभव केला. श्रीलंकेने दिलेले १२३ धावांचे मोजकेच आव्हान विंडिजने १८.२ षटकात सहज पार केले.  वेस्ट इंडिजने निर्धारित १८.२ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात १२७ धावा करत लंकेला मात दिली. सॅम्युअल बद्रीच्या ३ विकेट आणि आंद्रे फ्लेचरच्या तुफानी ८४ धावांच्या बळावर विंडिजने सोपा विजय मिळवला. विंडिजकडून आंद्रे फ्लेचरने ६४ चेंडूत ६ चैकार आणि ५ षटकार लगावत ८४ धावांचे योगदान दिले. रसेलने शेवटी येउन झटपट २० धावा बनवल्या.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १२२ धावा केल्या. श्रीलंकेकडून परेराने सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. श्रीलंकेची सुरवातच निराशाजन झाली मागील सामन्यातील विजयाचा शिल्पकार सलामीचा धडाकेबाज फलंदाज दिलशान १२ धावेवर बाद झाला. दिलशान बाद झाल्यानंतर एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जम बसवता आली नाही. एकवेळ श्रीलंकेच्या १० षटकात ५ बाद ५४ धावा होत्या. लंका १०० पर्यंत जाणार का हा प्रश्न चाहत्या मनात आला असेल पण अँजेलो मॅथ्यूज आणि परेरानी विकेटन पडू देता धावफलक हालता ठेवला एकेरी दुहेरी धावावर भर देत धावसंख्यावाठवण्याचा प्रयत्‌न केला. हाणामारीच्या षटकात अँजेलो मॅथ्यूज बाद झाल्याने धावसंख्येला खीळ बसली. आणि श्रीलंकेचा डाव निर्धारीत २० षटकात ९ बाद १२२ धावापर्यंत जाउन थांबला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, कर्णधाराचा हे निर्णय गोलंदाजांनी अचूक ठरवला, वेस्ट इंडिजकडून सॅम्युअल बद्रीने ३ आणि ब्राव्हो ने २ फलंदाज बाद केले.

Web Title: West Indies beat Sri Lanka by 7 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.