शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विश्वनाथन आनंदचा चेहरा बुद्धिबळला अधिक बळ देईल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 20:15 IST

Viswanathan Anand News : नवनियुक्त एआयसीएफच्या सदस्यांनी आनंदची चेन्नईतील त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. त्याच्यापुढे सल्लागार मंडळात येण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास आनंदने होकार दिला

- सचिन कोरडेपणजी - नावात बुद्धिबळाचे विश्व सामावून घेणारा पाच वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद आता चेस फेडरेशन आफ इंडियात (एआयसीएफ) वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. नवनियुक्त एआयसीएफच्या सदस्यांनी आनंदची चेन्नईतील त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. त्याच्यापुढे सल्लागार मंडळात येण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास आनंदने होकार देत देशात बुद्धिबळाला अधिक बळ देण्याचे आश्वासन दिले. आनंदच्या या भूमिकेमुळे आता फेडरेशनचेही ‘बळ’ वाढले आहे. आनंद पहिल्यांदाच फेडरेशनच्या सल्लागार मंडळात सहभागी झालाय, हे उल्लेखनिय.  यासंदर्भात, अखिल भारतीय बुदिधबळ संघटनेचे महासचिव भारत सिंग चाैहान यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, हो... आम्ही विश्वनाथन आनंदची भेट घेतली. नवी समिती असल्याने त्यानेही आमचे अभिनंदन केले. तसेच बुद्धिबळासाठी आपण अधिक योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली. सल्लागार मंडळाच्या प्रस्तावावर त्याने सकारत्मकता दाखवत लगेच तो स्वीकारला. आता आम्हालाही विश्वनाथन आनंदचे मार्गदर्शन तसेच सल्ला मिळणार आहे. आनंदच्या सहभागामुळे फेडरेशन देशात विविध उपक्रम राबवणार आहे. तसेच देशातील युवकांना प्रेरीत करण्यासाठी तसेच बुद्धिबळाकडे अधिक आकर्षित करण्यासाठी आनंद महत्वपूर्ण ठरेल. ऑलिम्पिकमध्ये समावेशाचा प्रस्तावबुद्धिबळ या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा,यासाठी प्रस्ताव यापूर्वीच पाठविलेला आहे. यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुद्धा सुरु आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळाचा समावेश झालेला आहे. आता ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, अशी आम्हाला आशा आहे. फेडरेशनचे गेल्या अनेक वर्षपासून प्रयत्न सुरू आहेत. याबाबतही आम्ही सकारात्मक आहोत, असे महासचिव भारत सिह चाैहान यांनी सांगितले. 

टॅग्स :Viswanathan Anandविश्वनाथन आनंदChessबुद्धीबळgoaगोवा