ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दणकून मार खाणारी टीम इंडिया लवकरच सुरू होणा-या दुस-या कसोटीत विजयी पुनरागमन करण्यासाठी कसून तयारी करत आहे. मात्र विजय मिळवण्यासाठी दडपण न घेता नॅचरल खेळ करण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे सामन्यापूर्वी ताजेतवाने होण्यासाठी टीम इंडियाचे सर्व शिलेदार नुकतेच पुण्यातील ताम्हिणी घाट येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. या ट्रेकमध्ये कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, आर.अश्विन, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, रवींद्र जाडेजा तसेच प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाही सहभागी झाले होते.
४ मार्च पासून बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी सुरू होणार आहे.
{{{{instagram_id####"https://www.instagram.com/p/BRAX25vA_yy/"}}}} {{{{instagram_id####"https://www.instagram.com/p/BRAfhW_li3T/"}}}} {{{{instagram_id####"https://www.instagram.com/p/BRCd-H3FMLd/"}}}} {{{{instagram_id####"https://www.instagram.com/p/BRAaQ1xgIGY/"}}}} {{{{instagram_id####"https://www.instagram.com/p/BRAY0G8A0ds/"}}}} {{{{instagram_id####"https://www.instagram.com/p/BRAeCu7grfU/"}}}}A beautiful sunset followed by an enjoyable Trek. A look at the team's fun activities - Video up on https://t.co/uKFHYdKZLG soon #TeamIndiapic.twitter.com/Eb2YapfDBa— BCCI (@BCCI) February 28, 2017