सिडनी : पकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या महत्त्वपूर्ण लढतीत फिनिशरची भूमिका वठविणारा आक्रमक भारतीय फलंदाज विराट कोहली याच्या चाहत्यांची यादी लांबलचक होत आहे. आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेलदेखील त्याचे प्रशंसक बनले.विराटचे कौतुक करीत चॅपेल म्हणाले, ‘‘सध्याच्या क्रिकेटमध्ये विराट कमालीचा खेळाडू आहे. त्याची स्वत:च्या फलंदाजीवरील पकड कमालीची म्हणावी लागेल. विकेटचे स्वरूप ओळखून वेगवेगळ्या स्वरूपाच्या खेळपट्टीवर कसे फटके मारायचे, हे त्याला चांगलेच अवगत आहे. पाकविरुद्ध भारताने झटपट तीन गडी गमविताच संघ अडचणीत आला होता. विराटने संयमी खेळी करीत संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला, शिवाय नाबाद अर्धशतक झळकविले.(वृत्तसंस्था)
विराटची फलंदाजीवर कमालीची पकड : इयान चॅपेल
By admin | Updated: March 22, 2016 02:50 IST