नवी दिल्ली : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीला सर्वाधिक १५ कोटी रुपये वेतनापोटी मिळाले आहेत. विशेष म्हणजे ठरविलेल्या वेतनापेक्षा अडीच कोटी रुपये त्याला अधिक मिळाले आहेत. भारताचा एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ठरल्या प्रमाणेच साडेबारा कोटी रुपये देण्यात आले. गौतम गंभीर, डेव्हीड मिलर, मनन व्होरा व सुनिल नारायण यांच्या वेतनात मात्र कपात करण्यात आली आहे. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या रक्कमेविषयी अधिक पारदर्शकता यावी यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या वेतनाची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने कोहलीला सर्वाधिक १५ कोटी रुपयांचे मूळ वेतन दिले आहे. कोहलीसह साडेबारा कोटी रुपयांचा करार झालेला असताना त्याला अडीच कोटी अधिक रुपये देण्यात आले आहे. अगामी हंगामापासून धोणी पुणेकडून खेळताना दिसेल. चेन्नई सुपर किंग्जकडून धोनीला करारप्रमाणे साडेबारा कोटी मिळाले. हरभजन सिंगला साडेपाच कोटी ऐवजी आठ कोटी, अंबाती रायुडुला ४ ऐवजी ६ कोटी रुपये देण्यात आले. वेस्ट इंडिजचा धडाकेबाज ख्रिस गेलला साडेसात कोटी वरुन ८ कोटी ४० लाख रुपये देण्यात आले आहेत.
कोहली वेतनामध्येही ठरला ‘विराट’ !
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST