शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

विराट कोहलीचा शतकांचा विक्रम हाशिम आमलाने मोडला

By admin | Updated: June 17, 2016 21:47 IST

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला याने वेस्ट इंडिजविरोधात तिरंगी मालिकेत शतक ठोकत विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. आमलाचे हे २३ वे शतक आहे

ऑनलाइन लोकमत

सेंट किट्स, दि. १७ : दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला याने वेस्ट इंडिजविरोधात तिरंगी मालिकेत शतक ठोकत विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. आमलाचे हे २३ वे शतक आहे. त्याने १३५ एकदिवसीय सामन्यांत १३२ डाव खेळत हे शतक पूर्ण केले. आमलाने वेस्ट इंडिजविरोधात या डावात ११० धावा केल्या. तो याबाबतीत विराट कोहलीला मागे टाकत सर्वात वेगवान २३ शतके करणारा फलंदाज बनला आहे.

हाशिम आमलाने १३२ डावांत ५२.२६ च्या सरासरीने ६४२९ धावा केल्या. त्यात २३ शतके आणि ३० अर्धशतके आहेत. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावे होता. त्याने १५७ डावांत २३ वे शतक झळकावले होते. या यादीत ए. बी. डीव्हीलियर्स (१८७ डाव) तिसऱ्या, तर सचिन तेंडुलकर (२१४ डाव) चौथ्या क्रमांकावर आहे.