शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

विराटची कमाल, केदारची धमाल! पहिल्या वनडेत भारताची बाजी

By admin | Updated: January 15, 2017 22:00 IST

कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधवच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडने दिलेल्या 351 धावांच्या आव्हानाचा तीन गडी राखून यशस्वी पाठलाग केला.

ऑनलाइन  लोकमत 
पुणे, दि. 15 - पूर्णवेळ कर्णधार म्हणून संघाची सूत्रे हाती आल्यानंतर  विराट कोहलीने पहिल्याच लढतीत केलेली दमदार शतकी खेळी, त्याला घरच्या मैदानावर खेळत असलेल्या केदार जाधवने तुफानी शतक ठोकून दिलेली जबरदस्त साथ,  दोघांनीही पाचव्या विकेटसाठी केलेली द्विशतकी भागीदारी आणि मोक्याच्या क्षणी दोन, तीन फलंदाज झटपट बाद झाल्यावर हार्दिक पांड्याने केलेली समयोचित खेळी या सर्वाच्या जोरावर भारताने आज पुण्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात  इंग्लंडला तीन गडी राखून कात्रजचा घाट दाखवला.  या विजयाबरोबरच भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली.
 इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 351 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव अडखळला आहे. शिखर धवन (1), लोकेश राहुल (8), युवराज सिंग (15) आणि  महेंद्र सिंग धोनी (6) हे खंदे फलंदाज झटपट माघारी परतल्याने भारताची अवस्था बिकट झाली. मात्र कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. यादरम्यान,  विराटने  इंग्लिश फलंदाजांची जोरदार धुलाई करताना 93 चेंडूतच शतकी मजल मारली. त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे 27 वे शतक ठरले. या खेळीदरम्यान विराटने केदार जाधवसोबत द्विशतकी भागीदारी करत भारतीय संघाला विजयासमीप पोहोचवले. मात्र शतक पूर्ण झाल्यानंतर विराट 122 धावा काढून बाद झाला. मात्र त्याने बाद होण्यापूर्वी केदारसोबत 200 धावांची भागीदारी करत लढतीचे पारडे भारताकडे झुकवले.
विराट बाद झाल्यावर केदारने सूत्रे हाती घेत आपले दुसरे वनडे शतक अवघ्या 65 चेंडूत पूर्ण केले. मात्र केदार जाधवही 120 धावा काढून बाद झाला.  
यजमान भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 350 धावा फटकावत भारतासमोऱ विजयासाठी 351 धावांचे आव्हान ठेवले. जेसन रॉय आणि  जो रूट यांच्या आक्रमक अर्धशतकांनंतर बेन स्टोक्सने केलेल्या घणाघाती फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळवले.
 इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर अॅलेक्स हेल्स 9 धावा काढून धावबाद झाला. त्यानंतर जेसन रॉय (73)  आणि जो रूट (78) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 69 धावा जोडत संघाला सुस्थितीत नेले. रॉय आणि रूटच्या अर्धशतकांनंतर शेवटच्या षटकांमध्ये बेन स्टोक्स (40 चेंडूत 62 धावा)  आणि मोईन अली (16 चेंडूत 28 धावा) यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने 50 षटकात 7 बाद 350 धावा फटकावल्या. इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताची गोलंदाजी आज पूर्णपणे निष्प्रभ ठरली. भारताकडून हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी दोन बळी टिपले. मात्र त्यांची गोलंदाजीही महागडी ठरली. शेवटच्या दहा षटकांत इंग्लंडने शंभरहून अधिक धावा कुटल्या. 
 तत्पूर्वी भारत आणि पाहुणा इंग्लंड यांच्यातील  पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघातून अजिंक्य रहाणेला वगळण्यात आले . तर, महाराष्ट्राचा मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवला संधी देण्यात आली. विराटने संघात अधिकाधिक अष्टपैलू खेळाडूंना संधी दिली.