शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपील फेटाळल्यानंतर विनेश फोगटची पहिली पोस्ट; रौप्य पदक गमावण्याचे दुःख आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 20:08 IST

आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादने अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवल्यानंतर विनेश फोगटने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

Vinesh Phogat : आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादने भारतीय कुस्तीपटूविनेश फोगटने ऑलिम्पिक फायनलपूर्वी अपात्र ठरविण्याविरुद्ध केलेले अपील  बुधवारी फेटाळले आहे. या निर्णयाने विनेशसह सर्व भारतीयांची मोठी निराशा झाली आहे. या निर्णयामुळे विनेश फोगटला रौप्य पदक मिळण्याचा मार्ग बंद झाला. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने विनेशला अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या निर्णयानंतर विनेशची पहिली पोस्ट समोर आली आहे. विनेशच्या या पोस्टमुळे क्रीडा रसिकही भावुक झाले आहेत.

भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाने सगळ्या देशाला प्रचंड दुःख झालंय. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील ५० किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीपूर्वी विनेश फोगटला अपात्र घोषित करण्यात आले. अंतिम फेरीच्या दिवशी विनेश फोगटचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे दिसून आले. अपात्र ठरवल्यानंतर विनेशने अंतिम सामना खेळण्यासाठी आणि रौप्य पदकासाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टकडे अपील केले होते. मात्र दोन्ही निर्णयावर विनेशच्या हाती निराशा आली. त्यानंतर आता विनेशने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

कुस्तीपटू विनेश फोगटने अपात्रतेनंतर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये अपील केले होते. मात्र विनेशचे अपील फेटाळण्यात आले. हे अपील फेटाळल्याने रौप्यपदकाची आशाही मावळली. आता या प्रकरणानंतर विनेशने एक पोस्ट शेअर केली आहे. विनेशने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विनेश मॅटवर डोळ्यांवर हात ठेवून अश्रू लपवत आहे. यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये बी प्राकचं गाणं वाजतंय. गाण्याच्या बोलानुसार सर्व मेहनत करूनही विनेशला तिच्या अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळाले नसल्याचे वाटत आहे. या फोटोवर अनेक कमेंट्सही आल्या आहेत.

विनेशने या भावनिक पोस्टवर कॅप्शनमध्ये काहीही लिहिलेले नाही. पण अनेक चाहत्यांनी विनेशला प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट केल्या आहेत. भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्राने कमेंटमध्ये "तू प्रेरणादायी आहेस, तू कौतुकास पात्र आहात. तू भारताचे रत्न आहेस, असं म्हटलं आहे. तसेच बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने लगेचच विनेश फोगटच्या पोस्टवर कमेंट करून लोकांचे मन जिकलं आहे. "तू आमचं खरं सोनं आहेस, चॅम्पियन आहेस," असं हुमा कुरेशीने कमेंट बॉक्समध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्ती