शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमवीर विराट कोहली

By admin | Updated: May 18, 2016 06:02 IST

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा कर्णधार विराट कोहली याने आयपीएलच्या एका सत्रात सर्वाधिक धावा ठोकण्याचा नवा विक्रम नोंदविला

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा कर्णधार विराट कोहली याने आयपीएलच्या एका सत्रात सर्वाधिक धावा ठोकण्याचा नवा विक्रम नोंदविला. काल कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ७५ धावांची खेळी करीत विराटने हा विक्रम स्वत:च्या नावे केला. त्याने आतापर्यंत १२ सामन्यात ७५२ धावा केल्या आहेत. साखळीतील संघाचे दोन सामने अद्याप शिल्लक असले तरी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या कोहलीने ख्रिस गेल आणि मायकेल हसी यांना मागे टाकले. एका सत्रात सर्वाधिक धावा नोंदविण्याची संधी कोहलीला आहे. कोहलीन्ला सुरुवातीला हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याच्याकडून आव्हान मिळाले होते. वॉर्नर सध्या तिसऱ्या स्थानावर घसरला. आरसीबीत कोहलीचा सहकारी असलेला डिव्हिलियर्स हा धावा काढण्यात दुसऱ्या स्थानावर आहे.डिव्हिलियर्सच्या १२ सामन्यात ५९७ धावा काढल्या असून त्याच्यात व कोहलीत १५५ धावांचे अंतर आहे. वॉर्नरच्या १२ सामन्यात ५६७ धावा आहेत. या तिघांशिवाय अन्य कुणीही आॅरेंज कॅपच्या चढाओढीत नाही. चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याच्या ४५९ आणि पाचव्या स्थानावर असलेला केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरच्या ४४९ धावा आहेत. आयपीएलच्या एका सत्रात ७०० वर धावा काढण्याचा मान आतापर्यंत दोनच फलंदाजांनी मिळविला. गेल्या दोन सत्रात एकही फलंदाज अशी कामगिरी करू शकला नव्हता. गेलने दोनदा आॅरेंज कॅप मिळविली. यंदा तो अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. सहा डावात त्याच्या केवळ ६८ धावा आहेत. (वृत्तसंस्था)>गेलने २०१२ मध्ये १५ सामन्यात ७३३ धावा केल्या. त्याने सचिनचा २०१० मध्ये केलेल्या ६१८ धावांचा विक्रम मोडित काढला होता.गेलने त्यानंतर २०१३ मध्ये १७ सामन्यात ७३३ धावा ठोकल्या. किंग्स इलेव्हन पंजाबचा फलंदाज शॉन मार्श याने २००८ च्या पहिल्या सत्रात ६१६ धावा ठोकून विक्रमाला सुरुवात केली होती. कोहली नवव्या सत्रात धमाल करीत असून त्याने १२ सामन्यात तीन शतके आणि पाच अर्धशतकांची नोंद केली आहे. यंदा आॅरेंज कॅपचा तोच मानकरी ठरणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.>आॅरेंज कॅपचे मानकरी खेळाडू २००८- शॉन मार्श (६१६ धावा) २००९- मॅथ्यू हेडन (५७२ धावा) २०१०- तेंडुलकर (६१८ धावा)२०११- ख्रिस गेल (६०८ धावा) २०१२- ख्रिस गेल (७३३ धावा)२०१३-माईक हस्सी(७३३ धावा) २०१४- रॉबिन उथप्पा(६६० धावा)२०१५- डेव्हिड वॉर्नर(५६२ धावा)