नवी दिल्ली : ‘तो भलेही आता हौशी बॉक्सर नाही. पण भारतात या खेळाची दारुण अवस्था पाहून त्याचेही मन हेलावते. बॉक्सिंगची प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आले.’ आॅलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदरसिंग याने खेळातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. स्टार व्यावसायिक बॉक्सर असलेला विजेंदर पंतप्रधानांना भेटला त्यावेळी दोघांच्या चर्चेचा विषय भारतीय बॉक्सिंगची दारुण अवस्था हाच होता. (वृत्तसंस्था)
विजेंदरने मोदींकडे मांडल्या भारतीय बॉक्सिंगच्या व्यथा!
By admin | Updated: March 24, 2016 01:29 IST