ऑनलाइन लोकमत
फतुल्लाह, दि. १२ - मुरली विजयच्या शानदार खेळीच्या (नाबाद १४४) जोरावर भारताने ९३ षटकांत ३ गडी गमावत ३९८ धावा केल्या आहेत.
शिखर धवन (१७३), रोहित शर्मा ( ६) व कर्णधार विराट कोहली (१४) एकापाठोपाठ एक बाद झाल्याने टीम इंडियाची घसरण झाली होती मात्र मुरली विजय व अजिंक्य रहाणेने (नाबाद ५५) चांगली खेळी करत भारताचा डाव पुन्हा सावरला.
पावसामुळे भारत वि. बांगलादेश कसोटीचा कालचा दुस-या दिवसाचा खेळ रद्द झाला होता मात्र आज पावसाने उघडीप दिल्याने तिस-या दिवसाच खेळ व्यवस्थित सुरू झाला. दीडशतकी खेळी करणारा धवन व नव्वदीत खेळणार विजय मैदानात उतरले. थोड्याच वेळात मुरली विजयने त्याचे शतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर शिखर धवन बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. त्यापाठोपाठ आलेला रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली पटापट बाद झाले व भारताचा डाव घसरला.
बांगलादेशतर्फे शकीब अल हसनने २ तर जुबैर होसेनने १ बळी टिपला.