शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

विजयाची कास धरा रे...

By admin | Updated: February 12, 2016 00:55 IST

पुण्याच्या गवताळ खेळपट्टीवर उणिवा चव्हाट्यावर आणल्यामुळे ‘अंडर डॉग’ मानल्या जाणाऱ्या युवा श्रीलंका संघाने पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय नोंदविला. त्यामुळे उद्या

रांची : पुण्याच्या गवताळ खेळपट्टीवर उणिवा चव्हाट्यावर आणल्यामुळे ‘अंडर डॉग’ मानल्या जाणाऱ्या युवा श्रीलंका संघाने पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय नोंदविला. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) महेंद्रसिंह धोनीपुढे घरच्या मैदानावर ‘करा किंवा मरा’ अशा दुसऱ्या लढतीत पाहुण्यांना पराभूत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचे अवघड आव्हान उभे ठाकले आहे.संघबांधणी प्रक्रियेतून वाटचाल करणाऱ्या युवा लंका संघात अनुभवी खेळाडू नाहीत, तरीही पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंना त्यांनी पाणी पाजले. टीम इंडियाने महत्प्रयासाने शंभरी गाठली. नंतर सामनाही गमाविला. विश्वचषकाच्या तयारीत असलेल्या भारतीय संघाचा हा पराभव डोळे उघडणारा ठरावा. शिवाय चुका सुधारण्याची ही संधी असावी, असे मानायला हरकत नाही. तीन सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने मागे पडलेल्या धोनी अ‍ॅन्ड कंपनीला दुसरा सामना जिंकून बरोबरी साधण्याची संधी असेल. रांचीच्या खेळपट्टीवर गवत नाही. ही खेळपट्टी मंद समजली जात असल्याने भारताला लाभ होऊ शकतो. हा सामना आधी दिल्लीत होणार होता. आता रांचीत होत असल्याने धोनीला घरच्या मैदानावर खेळण्याची संधी चालून आली आहे. येथे तो मोठी खेळी करेल, अशी आशा आहे. पुण्याच्या खेळपट्टीने दगा दिल्याचे त्याने सामन्यानंतर सांगितले होते, पण भारतीय फलंदाजांचे अपयश हेच पराभवाचे मुख्य कारण होते हे स्पष्ट झाले. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन हे दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. सर्वोत्कृष्ट फिनिशर असलेला धोनी दोन धावा काढून परतला. हार्दिक पंड्या आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा हेदेखील अपवाद नव्हते. पराभवामुळे मधल्या आणि तळाच्या फळीतील उणिवा चव्हाट्यावर आल्या. मोठ्या स्पर्धेत खेळताना प्रत्येक खेळाडूला आपली भूमिका चोखपणे बजावावीच लागेल हा धडा पराभवातून मिळाला. युवराज, रैना, हरभजन, नेगी आणि आश्विन यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. भारताने दुसरा सामना गमविला तर मालिकाही गमावेल. आणि असे घडू नये यासाठी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सुधारणा घडवून आणावीच लागणार आहे. लंकेचा युवा कर्णधार दिनेश चंडीमल हा संघासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याने विजयात सर्वाधिक ३५ धावांचे योगदान दिले. पदार्पणातच टिच्चून मारा करणारे कसून रजीता, दसनू शनाका, दुष्यंत चमिरा हे पुन्हा कहर करू शकतात. फलंदाजीची हवा काढणाऱ्या रजीतापासून अधिक सावध राहावे लागेल. एकूणच लंकेच्या युवा खेळाडूंना गंभीरपणे घेण्याचे आवघड आव्हान भारतापुढे राहील. (वृत्तसंस्था)संघ यातून निवडणारभारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराजसिंग, रवींंद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमरा, पवन नेगी, आशिष नेहरा, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि हरभजनसिंग. श्रीलंका : दिनेश चांदीमल (कर्णधार), दुष्मंता चामीरा, निरोशन डिकवेला, तिलकरत्ने दिलशान, बिनुरा फर्नांडो, दिलहारा फर्नांडो, असेला गुणरत्ने, धनुष्का गुणतिलका, चमारा कापुगेदारा, तिसारा परेरा, सीकुगे प्रसन्ना, कासून रजिता, सचित्रा सेनानायके, दासून सनाका, मिलिंदा सिरिवर्धना, जाफरी वेंडरसे.