शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Paralympics 2021 : १० वर्षांचा असताना दोन्ही हात गमावूनही इब्राहिम तोंडाच्या मदतीनं खेळतो टेबल टेनिस, Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 19:54 IST

अपंगत्वामुळे खचून न जाता आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक खेळाडू पॅरालिम्पिक स्पर्धेत जीव ओतून खेळतो आणि त्याची प्रचिती ही प्रत्येक पॅरालिम्पिक स्पर्धेत येतेच.

पॅरालिम्पिक २०२१ स्पर्धेत शुक्रवारी टेबल टेनिसपटू भाविना पटेल ( Bhavina Patel) हिनं ऐतिहासिक कामगिरी करताना C4 गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून भारतासाठी पहिलं पदक निश्चित केलं. भारताचेही असेच ५४ शूर टोक्योत दाखल झाले आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षाही उंचावल्या आहेत. पण, सध्या टोक्योत एका व्यक्तिची जोरदार चर्चा रंगली आहे. भारताच्या भाविनानं व्हिलचेअरवर बसून सुरेख टेबल टेनिस खेळताना माजी विजेत्याचे आव्हान संपुष्टात आणले. पण, हाच खेळ एक अवलिया तोंडाच्या साहाय्यानं खेळतो. 

इजिप्तचा इब्राहिम हॅमाड्टो ( Ibrahim Hamadtou ) हा सध्या टोक्योत सर्वांच्या केंद्रस्थानी आहे. दोन्ही हात नसल्यानंतर टेबल टेनिस खेळणे किती अवघड आहे, याचा फक्त विचार करून बघा.. लहान चेंडू असला तरी त्याचा वेग इतका असतो की तो परतावून लावताना चपळता लागते अन् अशा खेळात हातानं अपंग असलेल्या खेळाडूचा तग लागणे म्हणजे अवघडच. पण, इब्राहिमनं ही अशक्य गोष्ट करून दाखवली आहे. १० वर्षांचा असताना ट्रेन दुर्घटनेत इब्राहिमला दोन्ही हात गमवावे लागले. तरीही त्यानं टेबल टेनिसपटू बनण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यालाही या खेळातील बारकावे समजावून घेण्यात आणि त्या आत्मसात करण्यात अपयश आले. पण, तो खचला नाही.

टोक्योत दक्षिण कोरियाविरुद्धच्या पार्क हाँग-क्यूविरुद्धच्या सामन्यात C6 गटात त्याला पराभव पत्करावा लागला. पण, त्याच्या धाडसाचे सर्वच कौतुक करत आहेत. इब्राहिम म्हणाला,''मी या पराभवानं दुःखी आहे, परंतु मला आशा आहे की मी पुढील सामना जिंकेन.''

२०१६च्या रिओ स्पर्धेतून इब्राहिम यांनी पदार्पण केलं. त्यानं आफ्रिकन चॅम्पियनशीप व इजिप्त ओपन स्पर्धेत तीन रौप्यपदक जिंकली आहेत. त्याच्यासमोर फुटबॉलपटू होण्याचा पर्याय होता, परंतु त्यांनी टेबल टेनिसचीच निवड केली. ''

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाTable Tennisटेबल टेनिस